माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 09:05 PM2018-09-18T21:05:09+5:302018-09-18T21:08:56+5:30

माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील वाचकप्रेमी तरुणांनी पाचशे विविध सामाजिक विषयांवरील पुस्तकांचे वाटप केले.

distribution of books on the birth anniversary of former justice b.g. kolse patil | माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप

माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप

googlenewsNext

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील वाचकप्रेमी तरुणांनी विविध सामाजिक विषयांवरील पाचशे पुस्तकांचे माेफत वाटप केले. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी या पुस्तकांचे वाटप करण्यात अाले. 


    हर्षल लाेहकरे या तरुणाने  व त्याच्या मित्रांनी एक लाख माेफत पुस्तके वाटण्याचा संकल्प केला अाहे. त्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते, महापुरुष, मित्र यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ताे माेफत पुस्तकांचे वाटप करत असताे. काेळसे पाटील यांच्या वाढदिवासानिमित्त त्याने विविध सामाजिक विषयांवरील तब्बल पाचशे पुस्तके माेफत वाटली. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या पुस्तकांचे वाटप करण्यात अाले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना ही पुस्तके देण्यात अाली. 


    या उपक्रमाविषयी बाेलताना हर्षल म्हणाला, माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील हे अामचे मार्गदर्शक अाहेत. दिन-दलित, शाेषितांच्या लढ्याचं संघर्षमय नेतृत्व ते करत अाहेत. त्यांच्यापासून अाम्हाला प्रेरणा मिळते. अाम्ही मित्रांनी एक लाख पुस्तके वाटण्याचा संकल्प केला अाहे. अामचे प्रियजन, गुरुजन, मित्र यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अाम्ही ठरवून काही पुस्तके वाटत असताे. अाज काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात पाचशे विचारप्रवर्तक पुस्तके माेफत वाटत अाहाेत. पुस्तके दुसऱ्यांना भेट देण्याचा उपक्रम लाेकांनी स्वीकारणे अावश्यक अाहे. लाेकांना पुस्तक देऊन त्यांना वाचनाकडे पुन्हा अाणायला हवे. सध्याच्या वाॅट्सअॅप अाणि इतर गाेष्टींमुळे नागरिक काहीसे पुस्तकांपासून दुरावले अाहेत. त्यांची नाळ पुन्हा वाचनसंस्कृतीशी जाेडण्याचा अामचा हा प्रयत्न अाहे. 

Web Title: distribution of books on the birth anniversary of former justice b.g. kolse patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.