शास्त्रीय संगीत गुरू शोभा अभ्यंकर यांचे निधन
By Admin | Updated: October 17, 2014 23:40 IST2014-10-17T23:40:18+5:302014-10-17T23:40:18+5:30
शास्त्रीय संगीतातील गुरू आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या मातोश्री डॉ. शोभा अभ्यंकर (वय 69) यांचे आज पहाटे निधन झाले.

शास्त्रीय संगीत गुरू शोभा अभ्यंकर यांचे निधन
पुणो : शास्त्रीय संगीतातील गुरू आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या मातोश्री डॉ. शोभा अभ्यंकर (वय 69) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी 1क् वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. अभ्यंकर शास्त्रीय संगीतातील गुरू म्हणून एक ख्यातीप्राप्त नाव आहे. त्यांनी पुणो विद्यापीठातून बायोकेमिस्ट्री विषयात एमएस्सी केले. एसएनडीटी विद्यापीठातून संगीत विषय घेऊन एमए करताना विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच पुणो विद्यापीठातून त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट संपादन केले. ‘गानहिरा पुरस्कार’, वसंत देसाई पुरस्कार व पं. ना. द. कशाळकर पुरस्कारांच्या त्या मनकरी ठरल्या. शास्त्रीय संगीतात ‘गुरू’ म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘रागऋषी’ पुरस्कार आणि ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्रथम पं. गंगाधरबुवा पिंपळखरे व नंतर पं. वि.रा. आठवले आणि संगीतमरतड पं. जसराज यांच्याकडे झाले. डॉ. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणो विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठामधून अनेक शिष्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. त्यातील अनेकांना विविध पारितोषिके आणि राष्ट्रीय शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत.
‘सखी, भावगीत माङो’ या पुस्तकाचे त्यांनी लेखनही केले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
(प्रतिनिधी)