मांजरी पूल पाण्याखाली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:41 AM2018-08-22T03:41:51+5:302018-08-22T03:42:05+5:30

आठवडाभर संततधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

Cats pool under water? | मांजरी पूल पाण्याखाली ?

मांजरी पूल पाण्याखाली ?

Next

मांजरी : आठवडाभर संततधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पुणे परिसरात सतत पाऊस पडत असल्याने तसेच खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने मुळा-मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दिवसभर संततधार पाऊस व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने मांजरी येथील मुळा मुठा नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुराच्या शक्यतेमुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तो पूल पाण्याखाली गेल्यास वाहतुकीसाठी मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, हडपसर, शेवाळेवाडी, केशवनगर, मुंढवा, लोणीकाळभोर, फुरसुंगी, कोलवडी, थेऊर, केसनंद, वाडेबोल्हाई, आव्हाळवाडी, वाघोली अशा अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे.
पावसाळ्यात दरवर्षी मांजरी येथील पूल पाण्याखाली जात असतो. त्यामुळे पुलावरील असणारे सुरक्षारक्षक असणारे लोखंडी पाईप पावसाळ्याच्या कालावधीसाठी काढले जातात व पुन्हा काही महिन्यांनी पाईप बसवले जातात. परंतु अशा कालावधीत वाहतुकीच्या वेळी सर्व वाहनचालकांनी वाहनाची आणि स्वत:ची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Cats pool under water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.