बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: December 23, 2014 05:32 IST2014-12-23T05:32:22+5:302014-12-23T05:32:22+5:30

पवना सहकारी बँकेच्या पिंपरीगाव शाखेत खिडकीवाटे शिरून चोरी करण्याचा प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला

Bank robbery attempt is unsuccessful | बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

पिंपरी : पवना सहकारी बँकेच्या पिंपरीगाव शाखेत खिडकीवाटे शिरून चोरी करण्याचा प्रयत्न फसला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. लॉकर न उघडल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.
रविवारी बँक बंद असल्याची संधी साधत चोरटे खिडकीची काच उचकटून आत शिरले. सायरन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जोड बंद करून लॉकर खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉकर उघडत नसल्याने चोरटे निघून गेले. सोमवारी सकाळी बँकेतील कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीचे जोड बंद करण्यापुवीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याठिकाणच्या सुरक्षारक्षकांकडेही चौकशी केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bank robbery attempt is unsuccessful