न्यायालयाच्या परिसरात आरोपीवर वकिलांचाच हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 03:24 PM2018-10-24T15:24:39+5:302018-10-24T15:26:07+5:30

वकील देवानंद ढोकणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या अंगावर वकिलांचा जमाव धावून गेला. बुधवारी दुपारी न्यायालयाच्या परिसरात हा प्रकार घडला.

advocates attack on accused in court area | न्यायालयाच्या परिसरात आरोपीवर वकिलांचाच हल्ला 

न्यायालयाच्या परिसरात आरोपीवर वकिलांचाच हल्ला 

Next
ठळक मुद्देबढे याला न्यायालयीन कोठडी, वकिलांनी दिल्या एकजुटीच्या घोषणावकिलांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिसांचीही काहीकाळ भंबेरी अ‍ॅड.ढोकणे यांनी परत न केल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस

पुणे : वकील देवानंद ढोकणे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या अंगावर वकिलांचा जमाव धावून गेला. बुधवारी दुपारी न्यायालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर न्यायालय परिसरात वकिलांनी जोरदार घोषणाबाजी करीत वकील एकजुटीचा नारा दिला. 
      वकिलांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे पोलिसांचीही काहीकाळ भंबेरी उडाली होती. मात्र, त्यांनी आरोपीला सुरक्षितपणे वाहनापर्यंत नेले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीचे हक्क अबाधीत ठेऊन २ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 
यासंदर्भात सविस्तर असे की, संगमब्रीज येथे सोमवारी रात्री पावणेनऊ वाजण्याचे सुमारास कारमधून भाऊ बाळासाहेब ढोकणे यांचा सोबत घरी जात असलेले अ‍ॅड.देवानंद रत्नाकर ढोकणे (वय-४२, रा.येरवडा,पुणे) यांच्यावर दोघांनी गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने कुरमादास काळूराम बढे (वय-३२, रा.कलूस,ता.खेड) यास अटक केली.तर त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. बढे हा अ‍ॅड.ढोकणे यांचा पक्षकार असून त्याने एका खटल्याकरिता दिलेले दोन लाख रुपये अ‍ॅड.ढोकणे यांनी परत न केल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 
कुरमादास बढे हा शिरुर तालुक्यातील रहिवासी असून त्याचे वडीलोपार्जित जमिनीवरुन वडिलांच्या चुलत्यासोबत वाद सुरु होते. जमिनीचे वाद मिटत नसल्याने बढे याने न्यायालयात धाव घेत, खटला चालविण्याकरिता अ‍ॅड.ढोकणे यांना फीच्या स्वरुपात दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले. मात्र,पैसे नसल्याने त्याने वकिलांच्या सांगण्यानुसर गावा कडील २० गुंठे जमीन अ‍ॅड. ढोकणे यांचा भाऊ बाळासाहेब याच्या नावावर केली. दरम्यानच्या काळात बढे आणि त्याच्या चुलत्या मधील वाद हा अ‍ॅड.ढोकणे यांच्या सल्ल्यानुसार न्यायालयाबाहेर मिटला होता. त्यामुळे बढे याने जमीन परत नावावर करुन घेतली. तर अ‍ॅड.ढोकणे दोन लाख रुपये परत देत नसल्याने बढे याने त्यांच्यावर हल्ला केला. यासंदर्भात न्यायालयातील वकील संघटनेने मंगळवारी हल्याच्या निषधार्थ आंदोलन केले होते. 
दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने वकिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपीची ओळख परेड व्हायची असल्याने पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला. यानंतर पोलीस आरोपीसह बाहेर आल्यावर काही वकिल त्याच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी तातडीने आरोपीला गाडीत घालून नेले.

Web Title: advocates attack on accused in court area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.