पुण्यात गुंडांचा हैदोस, 10 ते 12 गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 12:23 PM2018-10-28T12:23:23+5:302018-10-28T12:28:33+5:30

पुण्यामध्ये काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. शनिवारी (28 ऑक्टोबर) रात्री हडपसर येथील ससाणेनगर भागात एका टोळक्याने कोयते आणि तलवारीने जवळपास 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

12 vehicles damaged in pune hadapsar sasane nagar | पुण्यात गुंडांचा हैदोस, 10 ते 12 गाड्यांची तोडफोड

पुण्यात गुंडांचा हैदोस, 10 ते 12 गाड्यांची तोडफोड

पुणे - पुण्यामध्ये काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. शनिवारी (27 ऑक्टोबर) रात्री हडपसर येथील ससाणेनगर भागात एका टोळक्याने कोयते आणि तलवारीने जवळपास 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पुण्यामध्ये मध्यरात्री 16 वाहनांची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ससाणे नगर मधील गल्ली नंबर 10 मध्ये शनिवारी रात्री चार ते पाच जणांच्या एका टोळक्याने तलवारी आणि कोयते घेऊन जवळपास 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली आहे. या तोडफोडीत दुचाकी आणि चार चाकी गाड्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओंकार गिरमे, निखिल तिकोटे, श्रीकांत जाधव, औदुंबर बिराजदार, महेश गायकवाड आणि इतर तीन जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी राजेश नेवसे हा आरोपी तेथून पसार झाला आहे. मात्र त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

 

Web Title: 12 vehicles damaged in pune hadapsar sasane nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.