आज २०,७१६ मतदान केंद्रांवर मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 05:08 AM2019-04-18T05:08:08+5:302019-04-18T05:08:25+5:30

राज्यात दहा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

Polling at 20,716 polling stations today | आज २०,७१६ मतदान केंद्रांवर मतदान

आज २०,७१६ मतदान केंद्रांवर मतदान

Next

मुंबई : राज्यात दहा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसºया टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून २० हजार ७१६ मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.
१५ पेक्षा जास्त उमेदवार असलेले चार मतदार संघ असून यापैकी
बीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे ३ बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदार
संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य ६ मतदार संघात प्रत्येकी एक बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम (३७ हजार ८५० बॅलेट
युनिट आणि २४ हजार ८५० कंट्रोल युनिट) तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदानकेंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था
करण्यात आली आहे. सुमारे १०
टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले
जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.
>मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्रे
मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, महसूल निर्मिती निर्देशांकद्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार यांचे ओळखपत्र
>मतदारसंघ उमेदवार
बीड ३६
हिंगोली २८
अमरावती २४
परभणी १७
नांदेड १४
मतदारसंघ उमेदवार
उस्मानाबाद १४
सोलापूर १३
बुलडाणा १२
अकोला ११
लातूर १०

Web Title: Polling at 20,716 polling stations today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.