अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:49 AM2019-04-17T05:49:36+5:302019-04-17T05:49:51+5:30

पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे.

Independent strengths are not yet known | अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

अपक्षांची ताकद अद्याप कळलेली नाही

googlenewsNext

बंगळूरू : पाणी, रस्ते अशा मूलभूत प्रश्नांकडे तुमच्या लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरच आहे. अपक्ष लोकप्रतिनिधीच मतदारसंघाची सेवा करू शकतो. अपक्षांची ताकद अजून मतदारांना कळलेली नाही, असे मत प्रख्यात अभिनेते व बंगळुरू (मध्य) मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी व्यक्त केले.
एका मुलाखतीमध्ये प्रकाश राज यांनी राजकारणाबाबतची आपली भूमिका, राजकीय विचारसरणी, राजकीय पक्षांचा खासदारांवरील प्रभाव या बाबींवर मतप्रदर्शन केले. मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडतात. त्याने त्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी त्यांची अपेक्षा असते. नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांना ते मत देत नाहीत. कारण ते नेते मतदारसंघातील समस्या सोडवत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या उमेदवारीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होत आहे का? या प्रश्नावर त्यांनी कोणते पक्ष धर्मनिरपेक्ष व कोणते धार्मिक हे कोण ठरविणार, असा प्रतिसवाल केला. कॉँग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवत असली, तरी ते सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीनंतर हा भ्रम दूर होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशामध्ये हिंदू दहशतवाद असल्याचेही ते म्हणाले.
आधी तुम्ही निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले आणि आता रिंगणात उतरला आहात, असे विचारले असता, प्रकाश राज म्हणाले की, निवडणुकांविषयी सामान्यांची अलिप्तता दूर व्हावी, यासाठीच मी निवडणूक लढवत आहे. त्यासाठी आम्ही चौकसभा, लोकांशी संवाद यावर भर देत आहोत. निवडणुकीचा प्रचार आता संपेलही, पण माझा प्रचार यापुढेही सुरूच राहील.
भाजप व कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे एखाद्या विश्वस्त संस्थेचे वाटतात, त्यांनी काही ना काही देण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या वेळी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्नही प्रकाश राज यांनी भाजपचे नाव न घेता केला.
>अभिनेतेही नागरिकच
कमल हसन, रजनीकांत आणि तुम्हाला राजकारणात प्रवेश करावासा का वाटला, असा प्रश्न करता राज यांनी आम्हीही नागरिक आहोत आणि आम्हालाही राजकारणात येण्याचा हक्क असल्याचे सांगितले. डॉक्टर, वकील राजकारणात येतात, तेव्हा असा प्रश्न उपस्थित होत नाही, मग अभिनेत्यांबाबतच असे का विचारता, असा सवालही त्यांनी केला.

Web Title: Independent strengths are not yet known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.