दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:25 AM2019-04-21T04:25:31+5:302019-04-21T04:26:07+5:30

हरयाणा, पंजाबमुळे फिसकटले

Due to a possible lead in Congress-AAP in Delhi | दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात

दिल्लीत कॉँग्रेस-आपमधील संभाव्य आघाडी संपुष्टात

Next

नवी दिल्ली : दिल्लीखेरीज अन्य राज्यांमध्ये आम आदमी पक्षासाठी जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने कायम ठेवल्याने या दोन पक्षांत आता दिल्लीतही आघाडी होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने शनिवारी तशी घोषणाच केली.

दिल्लीत आपने चार तर काँग्रेसने तीन जागा लढवाव्यात, असा समझोता काँग्रेसने सुचवला होता. त्याबाबत विचारता आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, राजधानीत कॉँग्रेससाठी ३ जागा सोडणे म्हणजे भाजपला त्या जागा बहाल करण्यासारखे आहे. ते म्हणाले की, कॉँग्रेसने हरयाणामध्ये ६:३:१ असे जागा वाटपाचे सूत्र पुढे केले होते. काँग्रेससाठी ६ जननायक जनता पक्षासाठी (जेजेपी)३ आणि ‘आप’साठी १ जागा असा प्रस्ताव होता. कॉँग्रेसचे दिल्लीत अस्तित्व नाही. तरीही त्यांना ७ पैकी लोकसभेच्या निम्म्या जागा हव्या होत्या. त्याच धर्तीवर कॉँग्रेसने पंजाब, हरयाणामध्ये आघाडी करायला हवी होती. पंजाबमध्ये आपचे २० आमदार आणि ४ खासदार आहेत. तरीही त्या राज्यासाठी आमच्याशी आघाडी करायला काँग्रेस का तयार नाही?

आणखी एक संधी देणार
आपचे नेते गोपाल राय म्हणाले की, कॉँग्रेसशी आघाडी करण्याच्या अखेरच्या प्रयत्नांमुळे ‘आप’ने उमेदवारांचे अर्ज भरणे स्थगित के ले होते. आज, शनिवारी आमचे पूर्व दिल्लीतील उमेदवार अर्ज दाखल करणार होते. मात्र, कॉँग्रेसला आघाडीच्या चर्चेसाठी आम्ही आणखी एक संधी देणार आहोत. त्यामुळे आमचे सर्व उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करतील.

Web Title: Due to a possible lead in Congress-AAP in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.