अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:02 PM2019-03-14T13:02:53+5:302019-03-14T13:23:12+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावाची जिल्ह्यातील नेत्यांनी बुधवारी शरद पवार यांच्याकडे शिफारस केली आहे.

Ahmednagar constituency from ncp MLA Arun Jagtap MLA Sangram Jagtap? | अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप?

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप की आमदार संग्राम जगताप?

googlenewsNext

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावाची जिल्ह्यातील नेत्यांनी बुधवारी शरद पवार यांच्याकडे शिफारस केली आहे. मात्र नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी देण्यावर अजित पवार ठाम आहेत.
त्यामुळे आज सकाळी अरुण जगताप यांचे नाव मागे पडले आहे. त्यांच्याऐवजी सुपुत्र संग्राम जगताप यांचे नाव पुढे आले आहे. आमदार अरुण जगताप काल दिवसभर नगरमध्ये होते, तर संग्राम जगताप मुंबईच्या बैठकीला उपस्थित होते. आमदार अरुण जगताप तातडीने आज सकाळीच मुंबईला रवाना झाले आहेत. जगताप पिता-पुत्रांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय होणार आहे.

Web Title: Ahmednagar constituency from ncp MLA Arun Jagtap MLA Sangram Jagtap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.