पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी ‘स्वच्छ भारत, स्वच्छ इंदिरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 16:06 IST2018-01-24T16:00:05+5:302018-01-24T16:06:34+5:30

इंदिरा महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकत, सामाजिक जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने स्वखर्चातून घेतलेल्या कचरा वाहतूक मोटारीद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी इंदिराने उचलली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation 'Clean India, Clean Indira' campaign for clean survey | पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी ‘स्वच्छ भारत, स्वच्छ इंदिरा’ अभियान

पिंपरी चिंचवड महापालिका स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी ‘स्वच्छ भारत, स्वच्छ इंदिरा’ अभियान

ठळक मुद्देस्वच्छ भारत स्वच्छ इंदिरा या अभियानाचा शुभारंभइंदिरा महाविद्यालयाचे स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे

वाकड : येथील इंदिरा महाविद्यालयाने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकत, सामाजिक जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने स्वखर्चातून घेतलेल्या कचरा वाहतूक मोटारीद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी इंदिराने उचलली आहे. महापालिकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत स्वच्छ इंदिरा या अभियानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे व महापालिका स्वच्छता अभियानाच्या ब्रॅण्ड अँबेसिडर, नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते इंदिरा स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. तर भारतीय परंपरेनुसार त्यांनी श्रीफळ फोडून व रिबन कापून कचरा गाडीचे लोकार्पण केले. यावेळी इंदिरा समुहाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर आणि समूह संचालक  प्रा. चेतन वाकलकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.   

Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation 'Clean India, Clean Indira' campaign for clean survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.