साडेचार लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:06 IST2018-03-28T02:06:52+5:302018-03-28T02:06:52+5:30
प्राप्तीकर विभागाच्या नावाने मेल पाठवून २०१८ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची प्राप्तीकराची

साडेचार लाखांची फसवणूक
पिंपरी : प्राप्तीकर विभागाच्या नावाने मेल पाठवून २०१८ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची प्राप्तीकराची रक्कम भरा, अन् ४४ लाख ५६४ रुपये परतावा मिळवा, अशी दिशाभूल करणारी माहिती मेलमध्ये देऊन बँकेचा तपशील मिळवून ४ लाख ५१ हजार रुपये त्या खात्यातून दुसऱ्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, कृष्णकुमार राम (वय ५५, रा. खडकी) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
अज्ञात व्यक्तीने प्राप्तीकर (इन्कम टॅक्स) विभागाच्या नावे बनावट मेल पाठविला. २०१८ च्या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीचा इन्कम टॅक्सचा हप्ता भरावा. जेणेकरून हा हप्ता भरल्यानंतर ४४ लाखांचा परतावा मिळेल. असे आमिष दाखविण्यात आले होते. मोठ्या रकमेचा परतावा मिळेल, असे आमिष दाखविल्याने कृष्णकुमार यांनी बँक खात्याचा तपशील त्यांना कळविला. बँक खात्याची माहिती मिळताच,अज्ञात आरोपीने त्या माहितीच्या आधारे कृष्णकुमार यांच्या बँक खात्यातून ४ लाख ५१ हजार रुपये परस्पर वर्ग
केले. खात्यातून साडेचार लाख रुपये परस्पर दुसºया बँक खात्यात जमा झाल्याची माहिती मिळताच, फसवणूक झाल्याची कृष्णकुमार यांच्या लक्षात आली.