गवताला लागलेली आग विझविल्याने टळली दुर्घटना
By Admin | Updated: March 29, 2017 02:12 IST2017-03-29T02:12:16+5:302017-03-29T02:12:16+5:30
मोरवाडी येथील वाळलेल्या गवताला सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक दलाचे जवान

गवताला लागलेली आग विझविल्याने टळली दुर्घटना
पिंपरी : मोरवाडी येथील वाळलेल्या गवताला सोमवारी दुपारी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे दुर्घटना टळली. मोरवाडी येथे वाळलेल्या गवत आहे. या गवताला दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक दलाचा एक आणि निगडी अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आग विझविली.आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. (प्रतिनिधी)