पिंपरीच्या महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव आणि उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 13:56 IST2018-08-04T13:01:27+5:302018-08-04T13:56:40+5:30
महापौरपदाच्या अर्जांची छाननी झाल्यावर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपाच्या जाधव यांचा विजय झाला.

पिंपरीच्या महापौरपदी भाजपाचे राहुल जाधव आणि उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदीभाजपाचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना ८० मते पडली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना ३३ मते पडली आहेत. सत्ताधारी भाजपाचे ३ नगरसेवक तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक अनुपस्थित राहिले. उपमहापौरपदी भाजपाचे सचिन चिंचवडे निवड होताना ७९ मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर यांना ३२ मते पडली. या उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांनी तटस्थाची भूमिका स्वीकारली. महापौर, उपमहापौर यांची निवड करण्यासाठी शनिवारी विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे यांनी कामकाज पाहिले.
सभेचे कामकाज सुरू होताच निवडणुक अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत निवडणुक अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामध्ये भाजपाचे राहुल जाधव यांचा विजय झाला. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. अपक्ष आणि मनसेनी भाजपाला मतदान केले.
..............................
पिंपरीचे महापौर महात्मा फुले यांच्या वेशात..!
पिंपरी-चिंचवडचे नियोजित महापौर राहुल जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन सर्वसाधारण सभेत आले आहेत. तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला आहे. वेगळा वेश परिधान करुन नियोजित महापौरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महापौर व उपमहापौरांची आज सकाळी ११ वाजता महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपाकडून राहुल जाधव व सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले असून त्यांचा निवड निश्चित आहे. महासभेला येताना जाधव हे महात्मा जोतिबा फुले यांचा वेश परिधान करुन महासभेत आला आहेत.
...................
महापौरपदासाठी डावलल्यामुळे भाजपाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित
शत्रुघ्न काटे महापौरपदासाठी इच्छुक होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु, त्यांना डावलण्यात आले. त्यांच्याएवजी जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे राहुल जाधव यांना महापौर देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले शत्रुघ्न काटे यांनी महासभेला अनुपस्थितीत राहत आपली नाराजी दाखवून दिली. तसेच पक्षादेश देखील झुगारला आहे.सभागृह नेत्याने पक्षादेश (व्हीप) देऊनही त्यांनी दांडी मारली. तसेच भोसरीचे रवी लांडगे देखील अनुपस्थित राहिले. नाराज असल्यानेच त्यांनीही दांडी मारल्याची जोरदार चर्चा पालिका वतुर्ळात सुरु आहे.