ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी अलर्ट; UPI पेमेंटसाठी आता लिमिट, जाणून घ्या, नेमके किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 01:39 PM2022-12-09T13:39:35+5:302022-12-09T13:55:15+5:30

UPI Payment : भाजी विक्रेत्याला पेमेंट करणे असो किंवा मॉलमधील फॅशनेबल ब्रँड्सच्या शोरूममध्ये असो, हल्ली सर्वत्र UPI पेमेंट झटपट केलं जातं.

UPI पेमेंट सिस्टीमने सर्वसामान्यांचं जीवन सोपं केलं आहे. रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेत्याला पेमेंट करणे असो किंवा मॉलमधील फॅशनेबल ब्रँड्सच्या शोरूममध्ये असो, हल्ली सर्वत्र UPI पेमेंट झटपट केलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की पेटीएम, जीपे आणि फोनपे सारख्या विविध UPI पेमेंट Apps वर UPI व्यवहार मर्यादा निश्चित केली आहे.

यूपीआय पेमेंट सिस्टममध्ये बँक टू बँक रियल टाईम ट्रान्सफर होतं. त्यामुळे वेगवेगळ्या बँकांनी यासाठी वेगवेगळी डेली लिमिट निश्चत केली आहे. Paytm, GPay आणि PhonePe वापर हा कोरोनानंतर आता मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी आता ही महत्त्वाची माहिती आहे. जाणून घेऊया, मर्यादा काय आहे...

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार आता यूपीआयमधून तुम्ही दररोज 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. त्याचबरोबर काही छोट्या बँकांनी ही मर्यादा 25 हजारांपर्यंत निश्चित केली आहे.

UPI पेमेंटसाठी पेटीएम App लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या App वर UPI पेमेंटची दैनंदिन कमाल मर्यादा (UPI डेली ट्रान्सफर लिमिट) फक्त 1 लाख रुपये आहे. त्याच वेळी, तुम्ही या App द्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 20 UPI व्यवहार करू शकता.

Paytm वर UPI पेमेंट मर्यादा देखील तासानुसार बदलते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुम्ही एका तासात पेटीएमवर 20,000 रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर करू शकत नाही. त्याच वेळी, प्रत्येक तासाला तुम्ही या App द्वारे जास्तीत जास्त 5 UPI व्यवहार करू शकता.

Paytm व्यतिरिक्त, PhonePe आणि Google Pay सारखे Apps देखील UPI पेमेंटसाठी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. यावरील डेली ट्रान्सफर लिमिट 1 लाख रुपये आहे. GPay एका दिवसात 10 व्यवहारांची सुविधा देते, तर PhonePe वर ही मर्यादा बँकेनुसार 10 किंवा 20 पर्यंत असते.

PhonePe आणि Google Pay या दोन्ही App वर तासाभराची मर्यादा नाही. पण एक खास गोष्ट म्हणजे या Apps जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची रिक्वेस्ट पाठवली तर हे App ते हॉल्ट करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.