BSNLचा जबरा प्लॅन!197 रुपयांमध्ये दररोज 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग, वैधता 150 दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 04:34 PM2021-12-19T16:34:44+5:302021-12-19T16:40:15+5:30

Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्यांनी आपल्या सर्व प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. पण, BSNL ने आपल्या प्लॅन्समध्ये कुठलेही बदले केले नाहीत.

Reliance Jio, Airtel आणि Vi या दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. पण सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) ने आपल्या प्लॅनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

BSNL कडे अशा अनेक योजना आहेत, ज्या तीन खाजगी दूरसंचार कंपन्यांपैकी कोणाकडेही नाहीत. आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका प्लानबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमीमध्ये 150 दिवसांची वैधता मिळेल.

BSNLचा हा प्लॅन दीर्घ वैधतेसाठी उत्तम पर्याय आहे. 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे.

मात्र, हे फायदे तुम्हाला सुरुवातीच्या काही दिवसांसाठीच मिळतील. हा प्लॅन तुम्हाला दररोज 2 GB डेटासह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग ऑफर देतो.

डेटा मर्यादा संपल्यानंतर, गती 40 kbps पर्यंत घसरते. यामध्ये तुम्हाला दररोज 100 जीबी डेटा आणि झिंग अॅपचे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जाते. मात्र, ही सुविधा पहिल्या 18 दिवसांसाठीच उपलब्ध आहे.

फायदे संपल्यानंतर, यूझर इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा सुरू ठेवण्यासाठी टॉप-अप प्लॅन आणि डेटा व्हाउचरची निवड करू शकतात.

180 दिवसांच्या वैधतेसह, यूझर टॉप अप न करता त्यांचा बीएसएनएल नंबर सुरू ठेवू शकतात. ज्यांना खूप कॉल येतात पण स्वतः कॉल करत नाहीत त्यांच्यासाठी ही एक उत्तम योजना आहे.