नुकसानीच्या गर्तेतील बीएसएनएलने ग्राहकांना दिला झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:19 PM2019-08-07T15:19:37+5:302019-08-07T15:22:04+5:30

नुकसानीच्या गर्तेत अडकलेल्या सरकारी कंपनी BSNL ने 5 कोटी ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने

कंपनीने प्रीपेड युजरना दिलेली अनलिमिटेड कॉलिंग सेवा काढून घेतली आहे. BSNL ने Rs 186, Rs 429, Rs 485, Rs 666 आणि Rs 1,699 या प्लॅनवरील अनलिमिटेड कॉलिंगची सेवा बंद केल्याचे वृत्त आहे.

बीएसएनएलला सध्या कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण बनले आहे. त्यातच स्पर्धा वाढल्याने खासगी कंपन्यांसारखे पॅक द्यावे लागत आहेत

यामुळे बीएसएनएलने ग्राहकाला दिवसाला केवळ 250 मिनिटेच मोफत ठेवली आहेत.

यामुळे या सरकारी कंपनीला खासगी कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea कडून मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.

खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने काही स्पर्धात्मक प्लान जाहीर केले होते. याशिवाय OTT सर्विस आणि अतिरिक्त डेटाही दिला होता. मात्र, बीएसएनएलने घेतलेला हा निर्णय निराशाजनक ठरण्याची शक्यता आहे.