PHOTOS: दगडूशेठ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:32 AM2022-03-21T10:32:16+5:302022-03-21T10:43:59+5:30

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि पिवळ्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व केमिकल विरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.