भारतातल्या 'या' राज्यात आहे महात्मा गांधींचं भव्य मंदिर; दररोज तीनदा होते पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 11:13 PM2019-08-16T23:13:25+5:302019-08-16T23:16:23+5:30

महात्मा गांधींना देशाचे राष्ट्रपिता संबोधले जाते. भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

कर्नाटकातल्या मंगळुरूमध्येही गांधीजींचं एक मंदिर आहे. गांधींचं हे मंदिर विशेष आहे. या मंदिरात गांधीजींची मूर्ती असून, दिवसातून तीनदा तिथे पूजा केली जाते.

महात्मा गांधींची अनुयायी या मंदिरात येतात आणि त्यांनी दाखवलेल्या अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात.

1948मध्ये मातीतून गांधीजींची मूर्ती साकारण्यात आली होती. 2006मध्ये जनतेच्या मागणीखातर मंदिराचं निर्माण करण्यात आलं.

तसेच गांधीजींच्या मूर्तीसमोर दररोज दिवा लावला जातो. गांधी जयंतीला या मंदिरात विशेष पूजेचं आयोजन केलं जातं. फळ आणि गोडधोडासह गांधीजींच्या प्रतिमेला ब्लॅक कॉफी अर्पण केली जाते. त्यानंतर ते भक्तांमध्ये प्रसादाच्या स्वरूपात वाटण्यात येते.