चित्रपटांमध्ये शानदार भूमिका साकारणाऱ्या आयपीएस अधिकारी Simala Prasad, ड्युटीनंतर करत होत्या रिहर्सल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:07 PM2023-03-31T12:07:06+5:302023-03-31T12:18:32+5:30

सिमाला प्रसाद यांचे सौंदर्य आणि टॅलेंट पाहून त्यांना अभिनयाची ऑफर आली.

चित्रपट सृष्टीत करिअर करण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. दरम्यान, या IPS अधिकारी सिमाला प्रसाद यांनी आपली ड्युटी सांभाळत अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सिमाला प्रसाद यांचे सौंदर्य आणि टॅलेंट पाहून त्यांना अभिनयाची ऑफर आली होती. त्यानंतर त्यांनीही ही संधी सोडली नाही, कारण त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड आहे.

सिमाला प्रसाद या 2010 च्या बॅचच्या अधिकारी आहेत, ज्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. याशिवाय, त्या अभ्यासात सुद्धा हुशार होत्या. त्यामुळेच त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली. त्या मध्य प्रदेशात 2010 च्या बॅचच्या अधिकारी झाल्या.

2017 मध्ये सिमाला यांचा पहिला चित्रपट अलिफ रिलीज झाला, तेव्हा त्या आयपीएस अधिकारी आहेत, यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. दोन वर्षांनंतर 2019 मध्ये नक्कश नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या. या चित्रपटात त्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

दिग्दर्शक जैगम इमाम यांनी सिमाला यांच्यात दडलेली कला ओळखली आणि त्यांना ही मोठी संधी दिली. त्यावेळी सिमाला ड्युटीवर असल्या तरी त्यांच्यासाठी अभिनय हे खूप मोठं काम होतं, पण त्या ड्युटीनंतर चित्रपटाच्या रिहर्सलसाठी वेळ काढत होत्या.

भोपाळमध्येच जन्मलेल्या आणि शिकलेल्या सिमाला प्रसाद यांनी पीसीएसची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे तर, त्यांचे वडील देखील यापूर्वी आयपीएस आणि लोकसभा खासदार राहिले आहेत, तर त्यांची आई एक साहित्यिक आहे, ज्यांना पद्मश्रीने सन्मानित देखील करण्यात आले आहे.