अरविंद केजरीवाल - कमल हासन यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 06:15 PM2017-09-21T18:15:20+5:302017-09-21T18:21:30+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (दि.21) दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांची त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी अरविंद केजरीवाल आणि कमल हासन यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.

मात्र, त्या दोघांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत भ्रष्टाचार या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आल्याचे कमल हासन यांनी सांगितले. तसेच, त्यांची भेट झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला, असेही कमल हासन म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करण्यासाठी कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन चेन्नई विमातळावर आली होती.