इश्क निकम्मा! ७ लेकरांची आई पडली मुलाच्या मित्राच्या प्रेमात; लग्नही केलं, आता कसा आहे त्यांचा संसार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 04:22 PM2021-08-04T16:22:30+5:302021-08-04T16:29:35+5:30

फिल्म प्रोड्यूसर विलियम म्हणाला की, 'मला माहीत होतं की, आमच्यात काहीतरी खास आहे. ती माझी ड्रीम वुमन होती आणि आताही आहे'. या नात्यानंतर कपल लवकरच सोबत राहू लागलं होतं.

लाइफ पार्टनर्सच्या वयात अंतर असलेल्या अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण ही कहाणी हैराण करणारी आहे. ७ मुलांची आई असलेली मर्लिन बटिगिएगने स्वत: कल्पना केली नसेल की, आपल्या मुलाच्या ज्या मित्राला ती व्हिडीओ गेम खेळण्यास मनाई करत होती, तोच पुढे जाऊन तिचा लाइफ पार्टनर होईल.

आपल्या मुलाचा मित्र विलियम स्मिथच्या प्रेमात पडलेल्या मर्लिनने केवळ तिच्यापेक्षा अर्ध्या वयाने लहान पार्टनरसोबत लग्न केलं नाही तर यासाठी तिने आयुष्यभर जगाचे टोमणेही ऐकले. या कपलच्या लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाले आहेत.

त्यावेळी मर्लिन ३५ वर्षांची होती आणि आपल्या मुलांसोबत वेस्ट ससेक्सच्या क्रॉलीमध्ये राहत होती. तेव्हा मुलाच्या १६ वर्षीय मित्र विलियमने तिला घरात काम करण्याची ऑफर दिली. मर्लिन मसल पॅन नावाच्या आजाराने ग्रस्त होती. तेव्हाच मर्लिन आणि विलियम एकमेकांप्रति आकर्षित झाले.

मर्लिनने सांगितलं की, 'या निर्णयाने दोघांच्याही परिवाराला धक्का बसला होता. पण मर्लिनच्या फॅमिलीने त्यांच्या मैत्रीच्या नात्याला समजून घेत होती. कारण विलियम तिची फार मदत करत होता'.

क्लीनिंग बिझनेस करणारी मर्लिन सांगते की, मला विलियमच्या आयुष्यातून जायचं नव्हतं आणि पुन्हा मुलंही नको होती. पण मी कधीच विलियमला फॅमिली बनवण्यापासून रोखलं नाही. त्याला हवं असेल तर तो ते करू शकतो.

फिल्म प्रोड्यूसर विलियम म्हणाला की, 'मला माहीत होतं की, आमच्यात काहीतरी खास आहे. ती माझी ड्रीम वुमन होती आणि आताही आहे'. या नात्यानंतर कपल लवकरच सोबत राहू लागलं होतं.

या नात्यामुळे मर्लिनच्या एका मुलाने तिच्यासोबतचं नातं तोडलं आणि विलियमच्या परिवाराने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. पण कपल म्हणतं की, ते तरी सुद्धा आनंदी आहेत.

फेब्रुवारी २००९ मध्ये या कपलने लग्न केलं होतं. ते हनीमूनला ही गेले होते. त्यांच्या लग्नाला आता १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर त्यांना सोबत राहून १५ वर्षे झाली आहेत.

इतके वर्ष होऊन गेले तरी मर्लिन आणि विलियमला लोकांची टोमणी ऐकावी लागतात. मर्लिन सांगते की, 'लोक आमच्याकडे वाईट नजरेने बघतात. पण आम्हाला आमच्या नात्यावर गर्व आहे'.

आता हे कपल त्यांच्या अपरंपरागत लव्हस्टोरीवर सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहे. यासाठी ते पैसा जमा करत आहेत. मर्लिन सांगते की, 'मला वाटतं की, लोकांच्या धारणा बदलण्याची गरज आहे. मी कल्पनाही करू शकत नाही की, दुसरं कुणी व्यक्ती मला विलियमपेक्षा जास्त प्रेम करू शकेल. मला त्याच्यावर विश्वास आहे'.