‘त्यांना सांगू नका’! जेव्हा किल्ल्यात अचानक घुमला भयभयीत आवाज; पर्यटक सैरावैरा पळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:04 PM2021-08-04T13:04:31+5:302021-08-04T13:08:33+5:30

जगात असे अनेक रहस्यमय दंतकथा आहेत. ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातल्या किती खऱ्या असतात किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे.

भूतप्रेताच्या गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील पण कधी तुम्हाला तुमच्या आसपास निगेटिव्ह एनर्जीचा भास झालाय? जर विचार करा, तुम्ही एखाद्या जुन्या किल्ल्यात गेला असाल जिथं खूप काळोख असेल आणि अचानक तुमच्या कानात आवाज ऐकायला येईल.

‘त्यांना सांगू नका’ असं ऐकायला आलं तर त्यावेळी तुमची काय अवस्था असेल हे शब्दात सांगणं कठीणच आहे. अशीच काहीशी घटना ब्रिटनच्या एका किल्ल्यात घडत आहे. याठिकाणी एका मुलीचा रहस्यमय आवाज ऐकायला येत असल्याचं काही लोक सांगतात.

ब्रिटनच्या नॉर्थ वेल्समध्ये कॉन्वी कैसल(Conwy Castle) आहे. ज्याला युनेस्को(UNESCO) ने हेरिटेजचा दर्जा दिला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी एका साधूची आत्मा वास्तव्य करते.

परंतु आता काही लोकांना दुसराच अनुभव आला आहे. Mirror.co.uk च्या रिपोर्टनुसार, कॅसलच्या आतमध्ये एका मुलीचा आवाज काही पर्यटकांना ऐकायला आला आहे. अनेकांनी तिचा आवाज ऐकल्याचा दावा केला आहे.

काही पर्यटक आतमध्ये गेले असता त्यांना आजुबाजूला निगेटिव्ह एनर्जी असल्याचा भास झाला. त्यानंतर काहींना एक छोटी मुलगी काहीतरी बोलत असल्याचं जाणवलं. जेव्हा लक्षपूर्वक हा आवाज ऐकला गेला तेव्हा ती मुलगी त्यांना ‘सांगू नका’ असं म्हणत असल्याचं सांगितले.

एकाने हा आवाज रेकॉर्ड केल्याचाही दावा केला आहे.त्यानंतर लोकं त्याठिकाणाहून पळाले. दरम्यान किल्ल्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधीही भूत-प्रेताच्या कहाणी समोर आली आहे. सध्या या किल्ल्यात एकटं जाऊ नका असं लोकांना सांगण्यात आलं आहे.

तज्ज्ञांनुसार, किल्ल्याचे बांधकाम १२८३ ते १२८७ दरम्यान झालं आहे. १६ व्या शतकात किंग हेनरी ८ ने याला जेलमध्ये रुपांतरीत केले होते. याठिकाणी अनेक कैद्यांवर अत्याचार केले जात होते. कैद्यांचा मृत्यूही झाला होता. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे आत्मे इथेच भटकत असल्याचं लोकांमध्ये चर्चा आहे.

टॅग्स :गडFort