ब्लू व्हेलच्या हृदयाचं वजन किती असतं? आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 02:56 PM2021-07-01T14:56:48+5:302021-07-01T15:08:26+5:30

काही लोकांचं मत आहे की, ब्लू व्हेलचं हृदय वॉक्सवॅगन बीटल्स कार इतकं असतं. म्हणजे १४ फूट लांब, ६ फू रूंद आणि ५ फूट उंच असतं.

जगात जेवढे जीव-जंतू आहे. त्या सर्वात वजनी आणि विशाल ब्लू व्हेल असते. या ब्लू व्हेलच्या हृदयाची लांबी आणि रूंदी व वजन वाचाल तर तुम्ही हैराण व्हाल. एकंदर असं म्हणता येईल की, ब्लू व्हेलचं हृदय हे जगातलं सर्वात मोठं हृदय असतं. काही लोकांचं मत आहे की, ब्लू व्हेलचं हृदय वॉक्सवॅगन बीटल्स कार इतकं असतं. म्हणजे १४ फूट लांब, ६ फू रूंद आणि ५ फूट उंच असतं.

यानंतर वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे. हे हृदय ५ फूट लांब, ४ फूट रूंद आणि पाच फूट उंच आहे. याचं वजन साधारण १९० किलोच्या आसपास असतं.

ब्लू व्हेलचं वजन सामान्यपणे ४० हजार पाउंड मानलं जातं. जर हृदय ४०० पाउंडचं असेल तर याचा अर्थ हा झाला की, हृदयाचं वजन ब्लू व्हेलच्या एकूण वजनांचं एक टक्के आहे. इतकं मोठं हृदय पृथ्वीवर कुणाचंच नाहीये.

आफ्रिकन हत्तीला सध्या पृथ्वीवरील सर्वात लांब-रूंद प्राणी मानलं जातं. याचं गोलाकार हृदय ३० पाउंड म्हणजे साधारण १३.६ किलोचं असतं. म्हणजे व्हेलचं हृदय हत्तीच्या हृदयापेक्षा १४ पटीने जास्त वजनी असतं.

तुम्हाला माहीत आहे का की, मनुष्याच्या हृदयाच वजन किती असतं. मनुष्याच्या हृदयाचं वजन साधारण १० औंसच्या बरोबर असतं म्हणजे २८३ ग्रॅम. म्हणजे व्हेलच्या हृदयाचं वजन मनुष्याच्या हृदयाच्या तुलनेत ६४० पट जास्त असतं.

ब्लू व्हेलचं वजन सामान्यपणे १५० टन ते २०० टन दरम्यान असतं. आकारात डायनासॉरही ब्लू व्हेलची बरोबरी करू शकत नाही. एका मोठ्या ब्लू व्हेलची लांबी ३० मीटर म्हणजे ९८ फूटाच्या आसपास असते. म्हणजे बोइंग ७३७ इतकी. जेव्हा व्हेलचं पिल्लू जन्माला येतं तेव्हा त्याचं वजन ०२-०३ टन असतं. तर लांबी ८ मीटर असते.

ब्लू व्हेल जगातल्या सर्वच महासागरांमध्ये मिळते. या दरवर्षी हजारो मैल प्रवास करतात. त्यांचा मेंदू फार छोटा असतो. हा मेंदू साधारण ६ किलोचा असतो. व्हेल सर्वात जास्त ऑक्सीजन घेते. त्यामुळे तिचे फुप्फुसंही सर्वात मोठे असतात. यांची क्षमता ५ हजार लीटरची असते.

व्हेलची शेपटी साधारण ७.६ मीटरची असते. ५ मोठे आफ्रिकन हत्ती एका लाइनमध्ये उभे केले तर ते व्हेल इतके दिसतील. ११ कार यात सामावू शकतात.