Bath Care Tips: रोज आंघोळ न करण्याचे आहेत अनेक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 09:49 AM2022-12-31T09:49:52+5:302022-12-31T09:55:26+5:30

Amazing benefits of not taking bath daily : चला तर आज जाणून घेऊ रोज आंघोळ न करण्याचे फायदे किंवा तुम्ही रोज आंघोळ करतही असाल तर कशी करावी.

Amazing benefits of not taking bath daily : थंडीच्या दिवसात बऱ्याच जणांना आंघोळ करणं पसंत नसतं. पण आपल्या शरीराची स्वच्छता फार गरजेची असते. आपल्या देशात रोज बरेच लोक तर या कारणाने आंघोळ करतात कारण त्यांची मान्यता असते की, पूजा-पाठ करण्यासाठी आंघोळ करणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतात की, रोज आंघोळ करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण रोज आंघोळ न करण्याचेही अनेक फायदे असतात. ते तुम्हाला माहीत आहेत का? चला तर आज जाणून घेऊ रोज आंघोळ न करण्याचे फायदे किंवा तुम्ही रोज आंघोळ करतही असाल तर कशी करावी.

काही लोकांचे गॅजेट्स त्यांच्याआधी उठतात. अशात जर मोबाइल फोन आणि सोशल मीडियाच्या नादात आंघोळ करायला वेळ मिळत नसेल तर हे चुकीचं आहे. पण तरीही आंघोळीला एक-दोन दिवसांचा गॅप झाला तर पॅनिक होण्याची गरज नाही.

नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल इनफार्मेशन (NCBI) मध्ये प्रकाशित एका शोधानुसार, आंघोळीने मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होते. एका शोधात रोज आंघोळ केल्याने लोकांमध्ये तणाव आणि चिंता अशी लक्षणे कमी दिसले. रोज आंघोळ करण्याचे फायदे कुणीही नाकारू शकत नाही. पण हिवाळ्यात आंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे.

आपण नेहमीच पाहतो की, काही लोक 5 मिनिटात फटाफट आंघोळ करून बाहेर येतात आणि काही लोकांना अर्धा-एक तासही लागतो. एक्सपर्ट्सनुसार, हेल्दी स्कीन आणि गुड हेल्थसाठी ड्राई स्किन असलेल्यांनी 5 मिनिटे आणि ऑयली स्किन असलेल्यांनी 8 ते 10 मिनिटांपर्यंत आंघोळ करणं बरोबर असतं. पण यासाठी नॉर्मल पाण्याचाच वापर करावा.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, किती वेळा आंघोळ करावी? रिसर्चनुसार, रोज आंघोळ न केल्याने काही साइड इफेक्टपासून तुम्ही बचाव करू शकता. त्यामुळे तुम्ही हिवाळ्यात गरजेनुसार किंवा एका दिवसाच्या गॅपनंतर आंघोळ करू शकता. फार गरम किंवा थंड पाणी तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं. अशात नॉर्मल पाण्याचा वापर करावा.

हलक्या गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेवरील रोमछिद्रे मोकळी होतात. अशा पाण्याने आंघोळ केल्याने बॅक्टेरिया मरतात. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या शरीराची क्षमता लक्षात घेऊनच आंघोळ करावी.

जास्त गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांच्या शरीरावरील केराटिन स्किनसेल्स मरतात. तर रोज आंघोळ न करणारे या सेल्सना वाचवू शकतात. रोज आंघोळ करणारे लोक साबण, शाम्पू आणि शावर जेलचा वापर करतात. याने पीएच लेव्हलमध्ये गडबड होते.

हेल्दी स्किनसाठी ऑयलचा थर आणि गुड बॅक्टेरिया यांच्यात संतुलन असलं पाहिजे. रोज आंघोळ केल्याने शरीराला आवश्यक हे जीवाणू लवकर नष्ट होतात. रोज आंघोळ केल्याने स्किन ड्राई होते. त्यासोबतच साबणातील केमिकलमुळे स्किन इन्फेक्शन किंवा एलर्जिक रिएक्शनचा धोकाही वाढतो. रोज आंघोळ न करणाऱ्यांची स्किन मेंटेन राहते.

हेल्थ आणि लाइफस्टाईल एक्सपर्ट्सनुसार, मानवी शरीरात अॅंटीबॉडी बनवणे आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तंत्राला निश्चित प्रमाणात कॉमन बॅक्टेरिया सूक्ष्म जीवांची गरज असते. रोज आंघोळ न करणाऱ्यांमध्ये ते कायम असतात. अशात अधून मधून आंघोळीला ब्रेक मिळाला तर काळजीची गरज नाही.