त्रिग्रही योग: ७ राशींना धनलाभ योग, अपेक्षित यश शक्य; कामे मार्गी लागतील, नशीब-भाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:12 PM2024-03-13T13:12:12+5:302024-03-13T13:18:33+5:30

कुंभ राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. कोणत्या राशींना आगामी काळ मंगलमय ठरू शकेल? जाणून घ्या...

मार्च महिन्यात महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला मंगळ मकर राशीत असून, मकर आणि कुंभ या दोन्ही शनीच्या राशी आहेत.

कुंभ राशीत मंगळाने प्रवेश केल्यानंतर त्रिग्रही योग जुळून येणार आहे. कुंभ राशीत शनी आणि शुक्र विराजमान आहेत. मंगळ प्रवेशाने मंगळ, शुक्र आणि शनी यांचा त्रिग्रही युती योग जुळून येत आहे. हा त्रिग्रही योग काही राशींसाठी मंगलमय ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

१५ मार्च रोजी मंगळ मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. सुमारे महिनाभरानंतर मंगळ गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान होईल. मंगळाचे कुंभ राशीतील गोचर आणि त्रिग्रही योगाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल? जाणून घ्या...

मेष: सकारात्मक परिणाम मिळतील. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. करिअरमध्ये लाभ मिळू शकेल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित प्रगती साधाल. रखडलेली कामे मार्गी लागू शकतील. बढती मिळू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध होतील.

वृषभ: कामाला गती मिळेल. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वडिलांचे सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय असेल तर चांगले यश मिळू शकते.

सिंह: करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांनाही चांगला नफा होईल.

कन्या: पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात यश मिळेल. भागीदारांशी समन्वय अधिक चांगला राहील. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. करिअरमध्ये अपेक्षित प्रगती झाल्यामुळे कुटुंबात आनंद राहील.

वृश्चिक: वाहन किंवा मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. भौतिक सुख मिळेल. आईशी नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील. व्यवसाय मालमत्ता, रिअल इस्टेट, वैद्यकीय किंवा लाल वस्तूंशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो.

धनु: संपत्ती वाढेल आणि. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. प्रगती होईल. करिअरमध्ये पुरेसा पैसा कमावण्याच्या संधी मिळतील. नशीब साथ देईल. परदेशात काम करायचे आहे त्यांना यश मिळेल.

कुंभ: जीवनात प्रगतीच्या संधी मिळू शकतील. करिअरमध्ये झपाट्याने प्रगती कराल. नोकरीत बदलीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकेल. आर्थिक बाबींमध्ये लाभाची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम असेल. आत्मविश्वास वाढेल. उत्तम समन्वय प्रस्थापित होईल. नशीब प्रत्येक बाबतीत अनुकूल ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.