Top Selling SUV : 'या' 5 एसयूव्ही खरेदी करण्यास लोकांची पसंती, शानदार लुक व फीचर्स तुम्हाला लावेल वेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:33 PM2023-04-14T16:33:28+5:302023-04-14T16:42:42+5:30

Top Selling SUV : एसयूव्ही कार आपल्या आकर्षक डिझाईन आणि परफॉर्मन्समुळे खूप लोकप्रिय होत आहेत.

नवी दिल्ली : स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयूव्हीची (SUV) मागणी देशात सातत्याने वाढत आहे. एसयूव्ही कार आपल्या आकर्षक डिझाईन आणि परफॉर्मन्समुळे खूप लोकप्रिय होत आहेत. दरम्यान, आम्‍ही तुम्‍हाला देशातील सर्वाधिक पसंतीच्‍या 5 एसयूव्ही कारंबद्दल सांगत आहोत. आमच्या यादीत टाटा नेक्सॉन ते मारुती सुझुकी ग्रँड विटारा यांचा समावेश आहे.

लोकांना टाटा नेक्सॉन खूप आवडते. अलीकडेच कंपनीने 5 लाख युनिट्स आणण्याची घोषणा केली होती. नेक्सॉन ही आपल्या सेगमेंटमधील एकमेव एसयूव्ही आहे, जी आयसीई आणि इलेक्ट्रिक अवतारांमध्ये सादर केली जाते. यामुळे नेक्सॉनला एसयूव्ही सेगमेंटमध्ये लीडर बनण्यास मदत झाली. टाटा नेक्सॉन हे भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या एसयूव्ही मॉडेलपैकी एक आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटा ने या एसयूव्हीच्या 14,769 युनिट्सची विक्री केली आहे.

मारुतीने अलीकडेच आपल्या ब्रेझाला (Brezza) अपडेट केले आहे. नवीन जनरेशनच्या ब्रेझाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या विक्री चार्टमध्ये ती कायम आहे. मारुती सुझुकीने मार्च महिन्यात ब्रेझाच्या 16,227 युनिट्सची विक्री केली आहे. पहिल्यांदाच, कंपनीने यामध्ये सनरूफ ऑफर केले आहे, जे लोकांना खूप आवडते.

ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) हे कंपनीचे प्रमुख मॉडेल आहे. कौटुंबिक एसयूव्ही कार म्हणून ती चांगलीच लोकप्रिय आहे. कंपनीने मार्च महिन्यात ह्युंदाई क्रेटाच्या एकूण 14,026 युनिट्सची विक्री केली आहे. जर तुम्ही चांगली फीचर्स आणि स्पेस असलेली एसयूव्ही कार शोधत असाल तर तुमच्यासाठी ह्युंदाई क्रेटा हा एक चांगला पर्याय असू शकतो.

टाटाची ही छोटी एसयूव्ही कार सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच चांगली मानली जाते. लोकांनाही ते खूप आवडतंय. मार्च महिन्यातील टाटा पंचच्या विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास, टाटाने एकूण 10,894 युनिट्सची विक्री केली आहे.

नुकतीच लाँच झालेली ही मारुती कार अनेक अॅडव्हॉन्स फीचर्ससह येते. कंपनीने हायब्रीड पॉवरट्रेन पर्यायासह ग्रँड विटारा सादर केली आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे लोक ही कार घेण्यास प्राधान्य देत आहेत. मार्च महिन्यात कंपनीने एकूण 10,045 युनिट्सची विक्री केली आहे.