हिवाळ्यात विंडशिल्डवरील धुके कसे घालवाल? अनेकांना येतेय समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:39 AM2023-11-16T10:39:40+5:302023-11-16T10:44:23+5:30

Car Care Tips: कमी तापमान आणि खराब दृश्यमानतेमुळे कार चालवणे जिवावर बेतू शकते. अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

हिवाळ्यात कार चालविणे खूप कठीण असते. जर तुमच्या विंडशिल्ड किंवा आरशांवर धुके जमू लागले तर समोरचे काही दिसत नाही. अनेकांना ही समस्या जाणवते. यापासून कशी मुक्तता मिळवाल?

हिवाळ्याच्या हंगामात, कमी तापमान आणि खराब दृश्यमानतेमुळे कार चालवणे जिवावर बेतू शकते. अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.

हिवाळ्यात, कार तसेच इंजिनचे तापमान देखील कमी असते. इंजिनला सामान्य तापमानापर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. मात्र तोपर्यंत कारमध्ये धुके साचू लागल्यास गाडी चालवणे गैरसोयीचे होते. अशावेळी एसी चालू केल्यास विंडशील्ड आणि इतर काचांवर धुके साचत नाही.

एसी पॅनलमध्ये हवेसाठी अनेक सेटिंग्ज देण्यात आल्या आहेत. यामुळे कार चालवताना केबिनमधील हवा विविध प्रकारे सेट केली जाऊ शकते. लोक फक्त डॅशबोर्डमध्ये स्थापित व्हेंटवर सेटिंग्ज करतात. परंतु थंड हवामानात धुक्यापासून संरक्षण करण्यासाठी ते विंडशील्डच्या दिशेने वापरणे गरजेचे असते.

महत्वाचे म्हणजे तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. काहीवेळा एसीचा फ्लो विंडशिल्डवर तर काहीवेळा हिटरचा फ्लो अशी कसरत करत रहावी लागेल. म्हणजे धुके गेले की पुन्हा एसी थोडा कमी, परत आले की हिटरचा प्रयोग आदी करत बसावे लागेल.

अनेक गाड्यांच्या मागील काचेवर काही रेषा असतात. हे केवळ डिझाइन नसते तर डिफॉगर असतो. तो चालू करून मागील काचेवरील फॉग घालविता येतो.

टॅग्स :कारcar