एक रुपयाही न देता घरी घेऊन या Ather ची दमदार EV; कंपनी देणार 100 टक्के फायनान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 06:19 PM2023-07-17T18:19:32+5:302023-07-17T18:23:27+5:30

Ather 450X Electric Scooter on EMI: सरकारने सबसिडी कमी केल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ झाली आहे. अशातच Ather ने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

Ather 100% Finance Plan: बंगळुरुमधील इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप कंपनी Ather ने ग्राहकांसाठी एक खास स्किम आणली आहे. तुम्ही आता सुलभ फायनान्स स्किमने Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. कंपनी 100 टक्के ऑन रोड फायनान्सिंग पर्याय देत आहे.

म्हणजेच, तुम्हाला ऑन-रोड किमतीच्या 100% कर्ज मिळू शकेल. यामुळे कंपनीला इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री वाढवण्यात मोठी मदत होईल. Ather ने 100% फायनान्स पर्यायासाठी अनेक फायनान्स कंपन्यांशी करार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Ather Energy ने IDFC First Bank, HDFC बँक, ICICI बँक, बजाज फायनान्स लिमिटेड, Axis Bank, Hero Fincorp आणि Cholamandalam Finance या कंपन्यांशी 100% ऑन-रोड फायनान्स पुरवण्यासाठी करार केला आहे. या संस्था तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास आर्थि मदत करतील.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. मात्र, चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत थोडी जास्त असते. सरकारने FAME 2 अनुदानात बदल केला आहे.

याचा परिणाम इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवरही झाला आहे. सबसिडी कमी केल्यामुळे अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटरचे दर वाढवले. अशात, एथरची 100 टक्के फायनान्स योजना नवीन खरेदीदारांना मोठा दिलासा देऊ शकते.

यापूर्वी कंपनीने 60 महिन्यांची कर्ज सुविधादेखील जारी केली आहे. कर्ज फेडण्यासाठी 5 वर्षांचा अवधी मिळाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हप्त्यांवर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार्‍यांसाठी EMI देखील 2,999 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

Ather कंपनीची 450X स्कूटर 1.28 लाखात मिळत आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही इलेक्ट्रिक स्कूटर 145 किमी अंतर पार करू शकते. याशिवाय कंपनी लवकरच Ather 450S लॉन्च करू शकते. या नवीन स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.3 लाख रुपये असेल.