सक्तीची कर वसुली थांबवा ;परभणीत व्यापारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:51 IST2017-11-25T23:50:52+5:302017-11-25T23:51:06+5:30
महापालिकेने सुरु केलेली सक्तीची कर वसुली बंद करावी, अशी मागणी परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

सक्तीची कर वसुली थांबवा ;परभणीत व्यापारी महासंघाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेने सुरु केलेली सक्तीची कर वसुली बंद करावी, अशी मागणी परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
परभणी शहरात स्थानिक संस्थाकर बंद झाला आहे. राज्य शासनाने स्थानिक कराकरीता परभणी आयुक्तांना एलबीटीबाबत आधीच्या एजन्सीने केलेले कामकाज पूर्णपणे रद्द करुन पर्यायी व्यवस्थेमार्फत परिगणना करावी व कर जमा करावा, असे नमूद केले असताना एलबीटी अधिकाºयांकडून व्यापाºयांना नाहक त्रास दिला जात आहे. शहरातील काही व्यापाºयांचे बँक खाते गोठविण्यात आले आहेत. ही कारवाई बेकायदेशीर असून विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करावी व राज्य शासनाकडे अहवाल जाईपर्यंत सर्व कारवाई थांबवावी, गोठविलेले बँकखाते पूर्ववत करावेत, सील केलेली दुकाने उघडण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी ३० नोव्हेंबरपर्यंत कारवाई झाली नाही तर परभणी शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा व्यापारी महासंघाने दिला आहे.