परभणीत शासन निर्णयाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:13 IST2017-11-27T00:13:06+5:302017-11-27T00:13:11+5:30
संविधान दिनासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाची २६ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात होळी करण्यात आली़

परभणीत शासन निर्णयाची होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संविधान दिनासंदर्भात राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाची २६ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात होळी करण्यात आली़
२६ नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो़ मात्र यावर्षी रविवारी संविधान दिन असल्याने संविधान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करावा, असा शासन आदेश जारी केला आहे़ त्यामुळे या अध्यादेशाची शहरात होळी करण्यात आली़ संविधान दिन अथवा इतर कोणताही राष्ट्रीय सण ज्या दिवशी आहे त्याच दिवशी साजरा केला जातो़
मात्र राज्य शासनाने हा दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करावा, असा अध्यादेश काढून संविधान दिनाचा अपमान केला़ १५ आॅगस्ट, २६ जानेवारी हे दिन ज्या दिवशी आहेत त्याच दिवशी साजरे केले जातात़ मग संविधान दिनाचा तिटकारा का? असा सवाल करीत अध्यादेशाची होळी करण्यात आली़
यावेळी लोकराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अमरदीप रोडे, शेकापचे किर्तीकुमार बुरांडे, सचिन पाचपुंजे, महेंद्र गाडेकर, सचिन लोखंडे, बंटी पगारे, नाथराव खंदारे, संदीप जोंधळे, संजय मकरंद, विशाल कुºहे, शिवाजी डहाळे आदींची उपस्थिती होती़