परभणीत मद्यप्राशन प्रकरणी पोलिसावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:43 IST2017-12-25T00:43:22+5:302017-12-25T00:43:43+5:30
मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाºयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

परभणीत मद्यप्राशन प्रकरणी पोलिसावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाºयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार प्रकाश गायके यांनी १५ डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून घरासमोर धिंगाणा घातल्याची तक्रार आकाश गंगावने यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन गायके यांना ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी येथील शासकीय रुग्णालयात गायके यांची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. २२ डिसेंबर रोजी नानलपेठ पोलिसांना वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला़
या अहवालानुसार नितीन वडकर यांच्या फिर्यादीवरून पोलीस हवालदार प्रकाश गायके यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले या प्रकरणाचा तपास करीत आहेत़