Mentrumpedia | मेन्स्ट्रुपीडिया : तिनं ठरवलं आपण जगजाहीर बोलायचं आणि जनजागृती करायचीच  
मेन्स्ट्रुपीडिया : तिनं ठरवलं आपण जगजाहीर बोलायचं आणि जनजागृती करायचीच  

- प्रज्ञा शिदोरे
आपल्यामध्ये असे अनेक विषय असतात ना की ज्याबद्दल बोलणं, चर्चा करणं याला (कुणी न सांगताही) मनाई असते. म्हणजे खरं तर हे विषय बोललो तर चालणार असतं, पण शी हे काय बोलायचे विषय आहेत का, असं म्हणून टाळलं जातं बोलणं! आणि त्यामुळेच अशा विषयांना अनेक गैरसमजांनी ग्रासलेलं असत. त्यापैकीच एक, खरं तर ज्याबद्दल सतत चर्चा व्हायला हवी असा विषय म्हणजे ‘ मासिक पाळी’. हा विषय आला की अनेकदा तोंडाला कुलूपच लागतात. शाळेत, साधारण सातवी किंवा आठवीमध्ये असताना अचानक मुलांना वर्गाबाहेर जायला सांगितलं जायचं किंवा त्यांना खेळायला पाठवलं जायचं आणि मुलींचा वर्गात ‘सेक्स एज्युकेशन’चा वर्ग घेतला जायचा. अर्थातच याबद्दल खुली चर्चा किंवा मोकळेपणाने बोलणं नाही. सारं कसं शांत शांत. त्या चार दिवसांविषयी काय ते मुलींनाच पटकन सांगून टाकलं जातं. पुढे तो विषय ‘अडचण’ या कॅटेगरीत ढकलून दिला जातो.

आदिती गुप्ता. तिच्या बाबतीतही वेगळं काही झालं नाही. वयाच्या बाराव्या वर्षी पाळी सुरू झाली. तेव्हा हे कोणालाही सांगू नको आणि बाहेर वाच्यता तर करूच नको असं घरच्यांनी तिलाही बजावलं. देवळात जाऊ नको, ताटं वाढू नको असंही सांगण्यात आलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर या ४-५ दिवसांमध्ये तू अशुद्ध आहेस असंच तिला सांगितलं गेलं. आदिती म्हणते, या अशा गोष्टींमुळेच मुलींच्या मनात लहानपणापासून आपण कुठेतरी कमी आहोत अशी शरमेची भावना यायला लागते. आता आदितीचा हा अनुभव काही तसा विरळा, वेगळा नाही. बहुतांश मुलींना हे सारं सहन करावं लागतं. ‘वेगळं बसायची’ पद्धत पाळावी लागली असेल. आणि पुन्हा मासिक पाळी सुरू आहे हे असं स्पष्ट सांगायची सोय नाही. सगळा कोडवर्डचा मामला.

खोट वाटेल, पण ‘पाळी’ याचे अनौपचारिक भाषेमध्ये समानार्थी किंवा त्या अर्थी सांगायचे जवळजवळ ५०० शब्द आहेत असं एक अभ्यास सांगतो. पण याबद्दल मोकळेपणाने बोलले मात्र जात नाही. मेन्स्ट्रुअल हायजिन डे निमित्त २०१६ साली एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा निष्कर्ष हेच सांगतो की, दक्षिण आशियामधील ३० टक्के मुलींना त्यांची पाळी सुरू होईपर्यंत याबद्दल काहीही माहिती नसतं. आणि ज्याबद्दल माहिती नसते त्याबद्दल शंका, भीती असणं हे साहजिकच आहे!

तर ही सारी माहिती हाताशी घेऊन गेल्या ५ वर्षांपासून आदिती या विषयात काम करते आहे. ही ३३ वर्षीय झारखंडमध्ये राहणारी इंजिनिअर तरुणी. ती म्हणते की ग्लोरिया स्टाइनम नावाच्या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका, अभ्यासक, पत्रकार हिचा एक लेख तिच्या वाचनात आला आणि सगळी कोडी सुटायला लागली. लेखाचं नाव आहे, ‘पुरु षांना पाळी येत असली /असती तर...? ’ (हा लेखही जरूर वाचा बरं का!)
पाळी आणि त्याला जोडलेल्या विषयांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आदितीने ५ वर्षांपूर्वी ‘मेन्स्ट्रुपीडिया’ नावाची वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटवर १० भारतीय भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या सचित्र पुस्तिका आहेत. मराठीतल्या या कॉमिक्सचं शीर्षक ‘मुलींसाठी मासिक पाळीविषयीची हसतखेळत मार्गदर्शिका’. यामध्ये मुलींच्या आणि मुलांच्या वाढत्या वयामध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, पाळी का येते? त्याविषयीची माहिती, तसेच मुला-मुलींनी या वयामध्ये कसा आहार घ्यावा याविषयी सुद्धा लिहिले गेले आहे. या पुस्तिकांमधली ‘प्रियाताई’ आपल्याला याविषयी सांगत असते.
२०१३ साली आदिती आणि तिचा तेव्हाचा बिझनेस पार्टनर आणि आत्ताचा लाइफ पार्टनर यांनी गुजरातच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइनमध्ये शिकत असताना, या चित्र पुस्तिकेच्या कामाची सुरुवात केली. यामध्ये प्राथमिक कल्पना म्हणजे मुला-मुलींना अतिशय साध्या, सोप्या, त्यांच्या भाषेत हा विषय समजावून सांगावा. म्हणजे, याविषयी ते आपापसात बोलतील आणि गैरसमज आपोआपच दूर होतील.
क्र ाउड फण्डिंगमधून पैसे उभे करून या जोडीने यू-ट्युब चॅनेलही सुरू केले. ज्यामधल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये ते याबद्दलची प्राथमिक कल्पना विस्ताराने सांगतात. पुढच्या व्हिडिओज मध्ये १० भारतीय भाषांमधून ते टप्प्याटप्प्याने हा विषय समजावून सांगतात.
हा अतिशय नाजूक विषय समजावून सांगण्यासाठी यापेक्षा प्रभावी माध्यम काय असणार.
तर ‘मेन्स्ट्रुपीडिया’ तुम्ही वाचा. हे व्हिडीओ पाहा. आणि आपल्या लहान बहीण-भावांनाही बघायला, वाचायला द्या!
पाहा
‘मेन्स्ट्रुपीडिया’चे यू-ट्युब चॅनेल -
 https://www.youtube.com/channel/UCj69ZCeeyl820rBHwjTX7Ew
वाचा
‘मेन्स्ट्रुपीडिया’ची वेबसाइट
 https://www.menstrupedia.com/
 


 


Web Title:  Mentrumpedia
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

ऑक्सिजन अधिक बातम्या

खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

खेलो इंडिया! तळातल्या ‘टॅलेण्ट’ला मिळालेला हा बळकट हात

11 hours ago

युवा करें, तो करें क्या?

युवा करें, तो करें क्या?

11 hours ago

नोकरी सोडून भाजी विकण्याचं वेड!

नोकरी सोडून भाजी विकण्याचं वेड!

12 hours ago

सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

6 days ago

आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

आकाशातून समुद्रात! 'हे' असं सगळं करायची विलक्षण क्रेझ उफाळली आहे!

6 days ago

कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

कष्ट मागणार्‍या, परीक्षा पाहणार्‍या आणि तरीही वेडी चटक लावणार्‍या जगात..

6 days ago