लग्नाआधीच अपेक्षांचा बोजा
By Admin | Published: April 7, 2016 12:40 PM2016-04-07T12:40:22+5:302016-04-07T12:40:22+5:30
पत्रिका, आर्थिक स्थिती, रंगरूप पाहून लग्न ठरतं. पण जेमतेम साखरपुडा होत नाही तर खटके उडायला लागतात. काही साखरपुडे मोडतात, तर काही लग्नानंतर वर्षभरात घटस्फोट घेतो म्हणत कोर्टात जातात. असं का?
>मीनल.
चारचौघींसारखीच!
घरच्यांनी वधू-वर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवलं.
लगेच एक साजेसं असं स्थळ आलं. दोघंही एकमेकांना पसंत पडली. कुटुंबांनी उत्साहाच्या भरात साखरपुडय़ाची तारीखदेखील काढली. साखरपुडा झालाही.
पण त्यानंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. पण होतं सुरुवातीला असं म्हणत या खटक्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं. लग्नही झालं. पण लग्नानंतर सहा महिन्यात त्यांचं प्रकरण घटस्फोटार्पयत गेलं. आम्ही दोघं एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत, आमचं नाहीच पटू शकत, असं म्हणत त्यांनी कोर्ट गाठलं. सगळे समजावून थकले पण काही उपयोग होत नव्हता. रुढार्थानं एकमेकांना अनुरूप असलेले, कुंडली, घराणं, आर्थिक स्तर सारं पटत असतानाही ‘आमचं पटत नाही’ एवढंच त्यांचं म्हणणं होतं.
महिला सहायता केंद्रात त्यांचं कौन्सिलिंग सुरू होतं. लग्न टिकवण्याचे प्रयत्न सुरू होते. पण ते ठाम होते. आमचं जमत नाही, आम्हाला घटस्फोट हवाच!
हे प्रातिनिधिक दृश्य पाहून धक्का बसतोच. मात्र अशी दृश्यं जेव्हा एकामागोमाग दिसतात आणि त्यात तरुण जोडप्यांचा, ठरवून किंवा प्रेमविवाह केलेल्यांचा, नुक्तं लगA झालेल्यांचा भरणा दिसतो, तेव्हा या प्रश्नाच्या गांभीर्याची जाणीव होते.
पुणो पोलिसांनीच सुरू केलेल्या महिला सहायता केंद्रात एक आख्खा दिवस बसून राहिल्यावर अशी विसंवादी जोडपी खूप दिसली.
आपलं पटत नाही, बॉण्डिंग नाही, स्वभाव जुळत नाही, त्यामुळे एकमेकांसोबत राहण्याची इच्छाच नाही असं अनेकांचं म्हणणं होतं. एकदा लग्न केलं ते मरेर्पयत निभवायचं असं मानणारे जुन्या काळात लग्न झालेलेसुद्धा हीच कारणं सांगत घटस्फोट मागताना दिसतात, तेव्हा नक्की कुठं काय चुकतंय याचा अंदाजच येत नाही.
पण ठळकपणो एक गोष्ट समोर येते ती म्हणजे लगA ठरवताना आपल्या आणि होणा:या जोडीदाराचे स्वभाव, वर्तन, जीवनशैली, विचार यांचा काहीच विचार न करता, त्यासंदर्भात न बोलता केवळ व्यावहारिकदृष्टय़ा स्थळ चांगलंय असा विचार करून जुळवलेले लग्न आणि लग्न ठरल्यानंतर काही दिवसांतच अनेकांमध्ये विसंवाद निर्माण होतो, आणि लग्न झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळापासून तो वाढीस लागलेला दिसतो.
हे सारं आपण आजच्या तारुण्याविषयी ऐकतोय, पाहतोय, वाचतोय यावर विश्वासच बसत नाही. कारण एखादी वस्तू बाजारातून विकत आणताना ऑनलाइन त्याचे रिव्ह्यू वाचून, चार जणांशी चर्चा करून मग ती विकत घेण्याचा निर्णय अनेकजण घेतात. किती चर्चा करतात. आपल्या गरजा काय आहेत याचा खल करत बसतात. केवढा चिकित्सकपणा. पण मग लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करताना फक्त आर्थिक स्थिती, स्टेटस आणि कुंडली एवढाच विचार करणं कसं बरोबर असेल?
आपण नक्की कसे आहोत, हेच अनेकांना माहिती नाही.
जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत, त्या प्रॅक्टिकल आहेत का, विसंगत आणि अवाजवी तर नाहीत ना याचाही विचार अनेकजण करत नाहीत. त्यात अनेक मुली ‘घरचे म्हणतील तसं’ म्हणत आपलं डोकंच वापरत नाहीत. घरचे त्यांच्या संसारातला हस्तक्षेप सुरूच ठेवतात असं चित्र या महिला सहाय्यता केंद्रात आलेल्या जोडप्यांच्यात तक्रारी नी संवाद ऐकताना दिसलं.
एकीकडे एकमेकांच्या अपेक्षांचे ओङो आणि दुसरीकडे तडजोडीचा अभाव यामुळे लगA टिकविण्यापेक्षा तोडण्याकडेच अनेक जोडप्यांचा कल वाढताना दिसतो आहे. अगदी किरकोळ कारणांवरून संसारात वादाला निमंत्रण मिळत असून, पाऊल मागे कुणी घ्यायचे या इगोनेही संसारात जागा घेतली आहे. विशेषत: आर्थिकदृष्टय़ा सबळ असणा:या जोडप्यांमध्ये तडजोड न करण्याचं प्रमाण वाढतं आहे असं चित्र दिसतं आहे.
आणि असं का होतं आहे?
तर साखरपुडा आणि लग्न यामध्ये मिळणारा वेळ यात खरं, प्रॅक्टिकल असं काही बोलणंच होत नाही. आपलं एक भलतंच रूप पेश केलं जातं, जे ‘तुङयासाठी कायपण’ असं तरी असतं किंवा एवढं चांगलं स्थळ आहे तर नेऊ आपण निभावून असं म्हणत स्वत:ची खोटी समजूत घालत आहेत ते स्वीकारलं जातं.
बोलणं होतं ते काय, तर तू खूप छान दिसतेस, लग्नाची खरेदी, हनिमूनला कुठं जायचं, किंवा मग सगळं लाडंलाडं, अतिरोमॅण्टिक. मात्र आपण कसे आहोत हे स्पष्ट सांगणं, दुस:याच्या आणि आपल्या अपेक्षा समजून घेणं यापैकी आपण कुठल्या गोष्टी तडजोड म्हणून स्वीकारणार आहोत हे मान्य करणं हे या दिवसात काहीच घडत नाही.
एकत्रित आयुष्य घालवण्यासाठीच्या गोष्टींवर चर्चा होणं अधिक महत्त्वाचं असतं. आहे. त्याचबरोबर स्वत:ला स्वत:ची ओळख असणं खूप गरजेचं ठरतं. ती असेल तरच आपण एकमेकांना योग्य आहोत का हे कळणं सोपं जातं. पार्टनर म्हणून एकमेकांसाठी कसे पूरक होऊ याचा विचार त्यातून सुरू होतो.
आणि म्हणून आता विवाहपूर्व कौन्सिलिंग करणं गरजेचं आहे असा एक विचार या विषयातले तज्ज्ञ मांडत आहेत. आपण एकमेकांना अनुरूप आहोत का आणि असलो तरी आपण एकमेकांना कसं समजावून घेऊ शकू, हे समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे.
आणि या केंद्रात कौन्सिलिंगसाठी आलेल्या जोडप्यांना पाहून वाटत राहतं की, यांनी जर लग्नापूर्वीच स्वत:ला आणि जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा कडवटपणा आयुष्यात आला नसता!
- नम्रता फडणीस
namrata.phadnis@gmail.com
( नम्रता ‘लोकमत’च्या पुणो आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)
आधी स्वत:ला ओळखा.
लग्न करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ची पुरेशी ओळख नसणं. अनेकदा स्वत:चे विचार, आवडी-निवडी याबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे लग्नाआधी स्वत:ची योग्य ती ओळख होण्यासाठी आपला स्वभाव, आपले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक विचार समजणं गरजेचं आहे. आपल्याच विचारांमध्ये स्पष्टता असेल तर समोरच्याचे विचार समजून घेणं अधिक सोपं जातं. आज अशी स्थिती आहे की, लग्न करताना मुलामुलींना घरातून योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर नाती, नवीन कुटुंब, शारीरिक-मानसिक ओढाताण यांतील समतोल कसा साधायचा हेच स्पष्ट नसतं. म्हणून ‘विवाहपूर्व समुपदेशन’ ही आता काळाची गरज आहे.
- लीना कुलकर्णी
विवाह समुपदेशक
विवाहपूर्व समुपदेशन कशासाठी?
* स्त्री आणि पुरुष यांचं व्यक्तिमत्त्व कसं वेगळं आहे हे कळतं.
* जोडीदार कसा हवा आहे, आक्रमक, मृदू, हळवा रोमॅण्टिक हे समजायला मदत होते.
* दोघांच्या स्वभावाचे गुणधर्म काय? तिच्या किंवा त्याच्या कोणत्या स्वभावाशी मी तडजोड करू शकतो हे आधीच ठरवता येऊ शकते.
* दोघांना लग्न करावेसे का वाटते आहे? जोडीदारामध्ये नक्की काय शोधत आहेत? एकमेकांकडून त्यांच्या अपेक्षा कोणत्या आहेत? की फक्त शारीरिक आकर्षण आहे? - याची उत्तरं मिळू शकतात.
* लग्नानंतर वादाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्याच्या अथवा तिच्याबरोबर लग्न केल्याचा पश्चात्ताप होणार नाही. जोडीदाराला गुणदोषासकट स्वीकारण्याची आपली मानसिकता तयार होईल.
- दीपा निलेगावकर
समुपदेशक