सिडनीमध्ये विराट-अनुष्काचा रोमान्स
By Admin | Updated: January 4, 2015 01:29 IST2015-01-04T01:29:29+5:302015-01-04T01:29:29+5:30
आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या गळ्यात अचानक कसोटी कर्णधारपदाची माळ पडली, ही केवळ ‘लेडी लक’ची कमाल असल्याची चर्चा आहे.

सिडनीमध्ये विराट-अनुष्काचा रोमान्स
सिडनी : आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी कर्णधारपदाची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीच्या गळ्यात अचानक कसोटी कर्णधारपदाची माळ पडली, ही केवळ ‘लेडी लक’ची कमाल असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विराट त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत मैदानासह मैदानाबाहेरही रोमान्स करताना दिसून येत आहे. अखेरचा कसोटी सामना शिल्लक असताना भारताने ही मालिका गमावलेली आहे. महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराटकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सिडनी कसोटी सामना युवा कर्णधार विराट व युवा खेळाडूंसाठी नवी सुरुवात असल्याचे मानले जात असले, तरी विराटवर मात्र याचे दडपण दिसून येत नाही. विराटने ६ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी सिडनीतील लोकप्रिय डार्लिंग हार्बरवर वेळ घालविला.
आॅस्ट्रेलिया संघाने विराटला सिडनीमध्ये लक्ष्य करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी कसून सराव करीत असले, तरी विराट मात्र कसलेही दडपण न बाळगता अनुष्कासोबत सुटीचा आनंद उपभोगत आहे. अलीकडेच टिष्ट्वटरवर ५० लाख फॉलोअर्सचा आकडा पार करणारा विराट व नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘पीके’च्या यशानंतर
अनुष्का एकमेकांसोबत सुटीचा आनंद घेत आहेत.
दरम्यान, प्रथमच स्थायी कर्णधार म्हणून सिडनी कसोटी सामन्यात विराटच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर राहणार आहे. (वृत्तसंस्था)