VIDEO : युवराज सिंग बनला पत्रकार, चहलची घेतली फिरकी
By Admin | Updated: February 3, 2017 00:28 IST2017-02-03T00:28:31+5:302017-02-03T00:28:31+5:30
सामना संपल्यानंतर चहलची युवराज सिंग याने पत्रकार बनून मुलाखत घेतली. चहलवर गमतीदार प्रश्नांचा भडीमार करत युवीने चहलला भंडावून सोडलं.

VIDEO : युवराज सिंग बनला पत्रकार, चहलची घेतली फिरकी
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 3 - तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव करत 2-1 अशी मालिका जिंकली. भारताच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो 25 धावांत 6 विकेट घेणारा युवा फिरकीपटू यजुवेंद्र चहल.
सामना संपल्यानंतर चहलची युवराज सिंग याने पत्रकार बनून मुलाखत घेतली. चहलवर गमतीदार प्रश्नांचा भडीमार करत युवीने चहलला भंडावून सोडलं. चहलनेही युवराजच्या प्रश्नांना तेवढीच गमतीदार उत्तरं दिली.
तुला उचलून घेतल्यावर कसं वाटल? तुझं वजन जास्त आहे की बॉलचं? असे उलट सुलट प्रश्न युवराजने चहलला विचारले. युवराजच्या तुझे वजन जास्त आहे की बॉलचे, या प्रश्नावर बॉलपेक्षा मी नक्कीच वजनदार असेल, असे उत्तर चहलने दिले. तर, मला उचलल्यावर डीडीएलजे या सिनेमाचे फिलींग आल्याचे उत्तर चहलने दिले. बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे.