सौरव गांगुली झाला सचिनच्या गाण्याचा चाहता
By Admin | Updated: April 5, 2017 14:01 IST2017-04-05T13:58:46+5:302017-04-05T14:01:59+5:30
क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणा-या "मास्टर ब्लास्टर" सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी आपलं एक गाणं लॉन्च केलं

सौरव गांगुली झाला सचिनच्या गाण्याचा चाहता
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचे "स्फोट" घडवून शतकांचं शतक करणा-या "मास्टर ब्लास्टर" सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी आपलं एक गाणं लॉन्च केलं. "क्रिकेट वाली बीट पे" हे गाणं सचिनच्या चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं. त्याच्या गायनाचा सचिनचा मित्र आणि भारतीय संघातील माजी सहकारी सौरव गांगुली चाहता झाला आहे. सचिनचं कौतूक करताना गांगुलीने एक ट्विट केलं आहे. गांगुलीचं हे ट्विट माजी धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागेनही रिट्विट केलं आहे.
वेलडन सचिन...खूप छान...प्रतिभा केवळ बॅटिंगपर्यंत मर्यादीत नाहीये. गांगुलीचं हे ट्विट सेहवागनेही लगेच रिट्विट केलं. या गाण्यामध्ये सचिनने त्याच्यासोबत वर्ल्डकप खेळणा-या सर्व खेळाडूंची आठवण काढली आहे.
‘गेंद आयी, बल्ला घुमा, मारा छक्का, सचिन सचिन… नाचो नाचो सब क्रिकेट वाली बीट पे’ असे या गाण्याचे शब्द आहेत. सोनू निगम सचिनच्या या नव्या इनिंगचा भाग आहे. मूळ संकल्पना आणि संगीत दिग्दर्शन शमीर टंडन यांचं आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आपण क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम रचताना पाहिलं आहे. मात्र आता त्याचा गाता गळा ऐकण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या सोबतीने सचिनने संगीत क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. काही तासातच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं.
@sachin_rt well done Tendulkar .. great stuff .. talent not restricted to batting only