दुसरी "केटीबीएस" आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

By Admin | Updated: May 7, 2017 18:45 IST2017-05-07T18:45:00+5:302017-05-07T18:45:16+5:30

दुसरी केटीबीएस" फिडे रॅपिड रेटिंग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा येथील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली.

Second "ktbs" with international chess competition enthusiasm | दुसरी "केटीबीएस" आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

दुसरी "केटीबीएस" आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 7 - दुसरी केटीबीएस" फिडे रॅपिड रेटिंग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा येथील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. रविवारी शेवटच्या 10 व्या राऊंडचे उद्घाटन कल्याण डोंबिवली शहर भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी केले. भारतातील ग्रँड मास्टर आर आर लक्ष्मण, वुमन ग्रँड मास्टर भक्ती कुलकर्णी यांच्यासह तब्बल 419 खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. सात वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
श्री शिवाजी आव्हाड यांनी 10 व्या राऊंडचे उद्घाटन करताना खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. भारताला विश्वविक्रमवीर विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. लहान वयातच बुद्धिबळपटू तयार होत असल्याबद्दल त्यांनी संयोजक श्री सहर्ष सोमण व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेत तब्बल दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

Web Title: Second "ktbs" with international chess competition enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.