कॅरम : व्हाईट स्लॅमची नोंद करत संदीपची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:19 PM2018-10-25T21:19:14+5:302018-10-25T21:20:18+5:30
कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
मुंबई : कार्याध्यक्ष चषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या २ ऱ्या फेरीत ओ एन जी सी च्या संदीप देवरूखकरने शिवतारा कॅरम क्लबच्या उदय मांजरेकरला व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-०, २५-५ असे सहज हरवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर जैन इर्रीगेशनच्या वरून गोसावीला ३ ऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी ए के फौंडेशनच्या शाहरुख शाह विरुद्ध २२-१५, ९-२२, २०-१३ असे झुंजावे लागले. ही स्पर्धा रिझर्व्ह बँक स्टाफ क्वार्टर्स, मुंबई सेंट्रल येथे सुरु असून मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे.
पुरुष एकेरी २ ऱ्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे
अब्दुल सत्तार ( माझगाव डॉक ) वि वि शांतीलाल जितीय ( मुंबई महानगपालिका ) २३-१५, २५-११
सूर्यकांत मोरे ( आयकर ) वि वि योगेश बांगर ( ए के फाऊंडेशन ) २५-०, २५-५
बळीराम कैरमकोंडा ( एलआयसी ) वि वि संजय वारंग ( सचिवालय जिमखाना ) २२-२४, २५-९, २५-८
दिलेस खेडेकर ( डी जी ए सेंट्रल ) वि वि सागर पवार ( विजय कॅरम क्लब ) १६-२०, २५-१६, २५-०
अनंत सुर्वे ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि संजय कदम ( म. का. क. केंद्र ) २५-०, २५-१
विनोद बारिया ( मुंबई महानगपालिका ) वि वि अमीर शेख ( विजय कॅरम क्लब ) २५-२, २५-०
सिद्धांत वाडवलकर ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि अंकुश गायकवाड ( बीइएस टी ) २५-१२, १९-२.
सचिन घटकांबळे ( माझगाव ) वि वि समीर शेख ( विजय कॅरम क्लब ) २५-४, २२-६.
जयसिंग चारानिया ( बोरीचा कॅरम क्लब ) वि वि दीपक पतंगे ( ए के फाऊंडेशन ) २३-१८, २५-१२.