झहीर घरात हॉकी स्टिक ठेऊ नकोस - वीरेंद्र सेहवाग

By Admin | Updated: April 25, 2017 12:26 IST2017-04-25T12:11:46+5:302017-04-25T12:26:43+5:30

युवराज सिंग आणि हेझल किचच्या लग्नात पहिल्यांदा सागरिका आणि झहीरचा एकत्र फोटो समोर आला तेव्हापासून या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरु झाली होती.

Do not keep a hockey stick in Zaheer - Virender Sehwag | झहीर घरात हॉकी स्टिक ठेऊ नकोस - वीरेंद्र सेहवाग

झहीर घरात हॉकी स्टिक ठेऊ नकोस - वीरेंद्र सेहवाग

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 25 - टि्वटरवरुन अनेक सेलिब्रिटी व्यक्त होतात पण सर्वाधिक चर्चा होते ती वीरेंद्र सेहवागच्या टि्वटची. एखाद्या महत्वाच्या घटनेवर किंवा एखाद्याला शुभेच्छा देताना वीरुने केलेले टि्वटची युझर्स मोठया प्रमाणावर दखल घेतात. वीरूने आता आपल्या खास शैलीत असेच हटके टि्वटकरुन झहीर खानला साखरपुडयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
झहीर लवकरच अभिनेत्री सागरिका घाटगेबरोबर विवाहबद्ध होणार आहे. सागरिकाने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असले तरी, चक दे इंडियामधील तिची हॉकीपटूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हाच धागा पकडून वीरेंद्र सेहवागने टि्वट केले आहे. 
अभिनंदन झहीर, हॉकीवर तू क्लीन बोल्ड झालास, आता घरात हॉकी ठेवायला देऊ नकोस, तुम्हा दोघांना यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा असे टि्वट सेहवगाने केले आहे. झहीरने सोमवारी रात्री सागरिकासोबतचा फोटो टि्वट करुन साखरपुडयाची घोषणा केली. त्यानंतर सोशल मीडियावरुन या दोघांना मोठया प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. 
 
युवराज सिंग आणि हेझल किचच्या लग्नात पहिल्यांदा सागरिका आणि झहीरचा एकत्र फोटो समोर आला तेव्हापासून या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरु झाली होती. अखेर काल रात्री झहीरने प्रेमाची कबुली दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झहीरने निवृत्ती स्वीकारली असून सध्या तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आहे. 

Web Title: Do not keep a hockey stick in Zaheer - Virender Sehwag