कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरे यांनी ठणकावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 07:30 AM2018-01-08T07:30:30+5:302018-01-08T12:17:53+5:30

मेक इंडियाच्या या धोरणामुळे कोकणची राख होणार असून गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली जाणार आहे. असा विकास शिवसेना कदापिही सहन करणार नाही....

Uddhav Thackeray condemned the project of not converting Konkan | कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरे यांनी ठणकावले 

कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको - उद्धव ठाकरे यांनी ठणकावले 

Next

नवी मुंबई - कोकणात विकासाची बुलेट ट्रेन आल्यावर तिथले निसर्गसौंदर्य आहे तसे राहील का, असे प्रश्नचिन्ह शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले आहे. वाशीतील ग्लोबल कोकण महोत्सवास ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी आयुष्याची राखरांगोळी करतील असे प्रकल्प कोकणात नको असल्याचे सांगत मेक इन इंडियाच्या माध्यमातून येणा-या काही प्रकल्पांना विरोध दर्शवला. कोकणच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यासाठी वाशीत ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी कोकण हा शिवसेनेचा कणा असल्याने, कोकणच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर काढून सर्वांसोबत येण्याची ग्वाही दिली. परंतु आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प कोकणात येत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

( आणखी वाचा - सरकार म्हणते आहे म्हणजे सगळे आलबेल असणारच- उद्धव ठाकरे )

मुंबईतले महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला पळवून वादग्रस्त प्रकल्प कोकणात आणले जात आहेत. त्यामुळे कोकणातील निसर्गाची हानी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विकासाचे स्वप्न साकारताना कोकणचे निसर्गसौंदर्यदेखील जोपासले जाणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत, आयुष्याची राखरांगोळी करणारे प्रकल्प नको असल्याचे त्यांनी सुचवले. तसेच विकासाची बुलेट ट्रेन आल्यावर कोकणचे निसर्गसौंदर्य टिकेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कोकणचा फायदा होईल असेच उद्योग-व्यवसाय तेथे आले पाहिजेत, परंतु त्यामध्ये कामगारवर्ग बाहेरचा असल्यास शिवसेना खपवून घेणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. या वेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही कोकणचा विकास करताना तिथले निसर्गसौंदर्य जपण्याची गरज व्यक्त केली. त्यानुसार नेमक्या कोणत्या पद्धतीने कोकणचा विकास केला जाऊ शकतो, त्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून एक संस्था नेमली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

( आणखी वाचा - कुठल्याही दबावाशिवाय अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, उद्धव ठाकरेंचा आयुक्तांना सल्ला )

या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राहुलदादा धर्माधिकारी, शिवसेना आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक शिवराम पाटील, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, किशोर धारीया, बीव्हीजीचे व्यवस्थापकीय संचालक हनुमान गायकवाड आदी उपस्थित होते. 

महासागराला दिशा दाखविणारा दिपस्तंभ

निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना सर्वजण दिपस्तंभ म्हणत. महासागरात भरकटलेल्या बोेटींना विंâवा जहाजांना दिशा दाखविण्याचे काम दिपस्तंभ करतो. मात्र नानासाहेब हे महासागरालाचा दिशा दाखविणारे दिपस्तंभ होते, असे उद् गार उध्दव ठाकरे यांनी काढून त्यांच्या पश् चात आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांनी समाजसेवेचा जो वसा पुढे चालू ठेवला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतूक केले. 

आमच्या नशिबात बोरी-बाभळींचे काटे - 

नानासाहेबांची तिसरी पिढी समाजाच्या सेवेत आहे. ते सर्वजण नानासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जात आहेत, आमचीही तिसरी पिढी राजकारणात आहे. दोन्ही कुटूंबाचे कार्य एकच असताना मला कायम घराणेशाहीच्या टिकेचा सामना करावा लागला. येथे जरी तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले असले तर आमच्या नशिबात आणि मार्गात नेहमीच बोरी-बाभळीचे काटे उभा राहिले, असे उध्दव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

परिणाम आम्ही का भोगायचे

जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प, राजापूरची रिफायनरी यांच्यासारखे सत्यानाश करणारे एक-एक प्रकल्प कोकणात आले तर माझे कोकण राहिल का, करणारे निघून जातील परिणाम आम्ही का भोगायचे, असा संताप यावेळी उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करून पर्यावरणाला घातक असलेले काही प्रकल्प तुमच्याकडेही घेऊन जा, अशी जोरदार चफराक लगावली.

चांगल्या अभ्यासातून चांगला उद्योग उभा राहिल

उद्योग उभा करण्यासाठी ध्येय, निश्चिय आणि चिकाटी या बाबी महत्त्वाच्या आहेत. नोक-या निर्माण करणारे उद्योग निर्माण करण्यासाठी अभ्यासुवृत्तीची गरज आहे. अभ्यास नसेल तर संयम येणार नाही आणि आपण आपले निश्चित ध्येय गाठू शकणार नाहीत. आज मला येथे सन्मानित करण्यात आले तो गौरव माझा नसून मी घडविलेल्या सर्व उद्योजकांचा आहे, असे प्रतिपाद सचिनदादा धर्माधिकारी यांनी केले. 

 

Web Title: Uddhav Thackeray condemned the project of not converting Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.