गुंगीचे औषध देऊन मुलाचे केस कापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:12 IST2017-08-18T05:12:53+5:302017-08-18T05:12:56+5:30
महिलांच्या वेण्या कापण्याचे प्रकार मुंबईत घडत असताना पनवेल येथील कामोठे परिसरात एका मुलाचे केस कापल्याची विचित्र घटना गुरुवारी दुपारी घडली.

गुंगीचे औषध देऊन मुलाचे केस कापले
पनवेल : महिलांच्या वेण्या कापण्याचे प्रकार मुंबईत घडत असताना पनवेल येथील कामोठे परिसरात एका मुलाचे केस कापल्याची
विचित्र घटना गुरुवारी दुपारी घडली. दिलवा यादव (१६) हा कामोठे सेक्टर १६ येथील चॅनल कॉर्नर या इमारतीमधील आपल्या भावाच्या वेल्डिंगच्या दुकानावर गेला होता. या वेळी अचानक दिलवाला चक्कर आली. तासाभरात त्याचा भाऊ चंदन पासवान हा दुकानात आल्यानंतर त्याने दिलवाला झोपेतून उठवले. मात्र या वेळी दिलवाचे केस कोणीतरी कापले असल्याचे चंदनच्या लक्षात आले. या वेळी दिलवानेदेखील कोणीतरी मला गुंगीचे औषध दिल्याचे सांगितले. दिलवा हा बिहारमधील मूळ रिहवासी आहे.