रेहान कुरेशीविरोधात दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:21 AM2018-12-08T00:21:16+5:302018-12-08T00:21:23+5:30

राज्यभर खळबळ उडवणाऱ्या पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेहान कुरेशीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Filed in the chargesheet against Rehan Qureshi | रेहान कुरेशीविरोधात दोषारोपपत्र दाखल

रेहान कुरेशीविरोधात दोषारोपपत्र दाखल

Next

नवी मुंबई : राज्यभर खळबळ उडवणाऱ्या पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेहान कुरेशीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कोपरखैरणे व नेरुळ येथील दोन गुन्ह्यांच्या तपासाचा त्यात समावेश आहे. त्यानुसार हा खटला चालवण्यासाठी पोलिसांनी शासनाकडे विशेष सरकारी वकिलाची मागणी केली आहे.
पॉक्सोच्या २० हून अधिक गुन्ह्याप्रकरणी रेहान कुरेशी (३४) याला नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याने नवी मुंबईसह पालघर, ठाणे व मुंबई परिसरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केले आहेत. तर २०१० मध्ये कुर्ला येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारानंतर हत्येचे गुन्हेही त्यानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे; परंतु एकापाठोपाठ एक सलग गुन्हे करत असतानाही अद्यापपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर ५०० हून अधिक तासांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या केलेल्या तपासामुळे अवघ्या चालण्याच्या शैलीवरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश वाघमारे यांनी त्याला शिताफीने पकडले. चौकशीत त्याने कबूल केलेल्या गुन्ह्यांचा पोलीस तपास करत आहेत. त्यापैकी कोपरखैरणेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नेरुळमधील मुलीवर बलात्काराचा प्रयत्न या दोन गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी कुरेशीवर पॉक्सोचा गुन्हा दाखल आहे. त्याचे दोषारोपपत्र शुक्रवारी गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयापुढे सादर केले. त्यामध्ये तपासाच्या तांत्रिक बाबींसह इतर अनेक सबळ पुराव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. लवकरच हा खटला सुरू होणार असल्याने सर्वांचेच निकालाकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Filed in the chargesheet against Rehan Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.