अल्पवयीन चुलतबहिणीवर भाऊच करायचा लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 05:55 PM2018-03-03T17:55:22+5:302018-03-03T17:55:22+5:30

चुलत बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या भावाला सानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाशीतील अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे.

cousin sister sexually exploitated by brother | अल्पवयीन चुलतबहिणीवर भाऊच करायचा लैंगिक अत्याचार

अल्पवयीन चुलतबहिणीवर भाऊच करायचा लैंगिक अत्याचार

Next

नवी मुंबई - चुलत बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या भावाला सानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो वाशीतील अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थिनी शिकत असलेल्या शाळेतील शिक्षिकेमुळे हा प्रकार उघडकीस आला. 

पीडित मुलगी १४ वर्षाची असून सानपाडा येथे चुलत्यांकडे शिक्षणाच्या निमित्ताने राहायला आली होती. मुलीच्या शिक्षणाचा भार पडत असल्याने चुलत्यांनी तिला शिक्षणासाठी नवी मुंबईत स्वतःकडे आणले होते. त्याठिकाणी चुलते, चुलती व चुलत भाऊ यांच्यासोबत ती राहायला होती. यादरम्यान आई वडील नोकरी निमित्ताने घराबाहेर गेल्यानंतर १९ वर्षाचा चुलत भाऊ तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. 

गेले वर्षभर होत असलेल्या या अत्याचाराची माहिती पीडित मुलीने तिच्या एका मैत्रिणीला दिली होती. त्या मैत्रिणीने ही बाब शाळेतील शिक्षिकेला सांगितल्यानंतर शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन विचारले असता प्रकार समोर आला. त्यानुसार शिक्षिकेने सानपाडा पोलिसांना कळवल्यानंतर चुलत भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: cousin sister sexually exploitated by brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा