उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार काय ?, प्रकाश राज यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 12:47 PM2017-11-26T12:47:31+5:302017-11-26T14:03:47+5:30

नवी दिल्ली- नोटाबंदी, जातीयवाद आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणा-या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे.

Will the Winter Session be held till the summer? | उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार काय ?, प्रकाश राज यांचा सरकारला सवाल

उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार काय ?, प्रकाश राज यांचा सरकारला सवाल

Next

नवी दिल्ली- नोटाबंदी, जातीयवाद आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणा-या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. उन्हाळ्यापर्यंत तरी हिवाळी अधिवेशन होणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपावर निशाणा साधला आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतं. परंतु यंदा अद्यापही अधिवेशन झालेलं नाही. अधिवेशन बोलावण्यास होणाऱ्या दिरंगाईबद्दल प्रकाश राज यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

अजून थंडी पडलेली नाही काय?, मग हिवाळी अधिवेशन का बोलावलं नाही, तुम्ही दुसरीकडे कुठं व्यस्त आहात का? निवडणुकीआधी उत्तर देणं तुम्हाला लाजिरवाणं वाटतंय का', असे सवाल प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावरील वारंवार होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी ‘जस्ट आस्किंग’, असं हॅशटॅग करत टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जस्ट आस्किंग’च्या माध्यमातून प्रकाश राज हे मोदी सरकारला नेहमीच अनेक प्रश्न विचारत असतात. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही त्यांनी मोदी सरकारवर टि्वटरवरून टीका केली होती.

गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत मौन बाळगणारे मोदी हे माझ्यापेक्षाही चांगले अभिनेते आहेत. त्यामुळे माझे राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांनाच देण्यात यावेत, असंही ते म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. देशात घडणाऱ्या चुकीच्या घटनांविरोधात आवाज उठवल्यानंतर आपला आवाज दाबण्याचं काम हे ट्रोल्स करतात. पण आपण न घाबरता जे योग्य आहे ते बोलत राहिलं पाहिजे, असं मत त्यानं एकदा मांडलं आहे. 



 

Web Title: Will the Winter Session be held till the summer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.