हिंदू कोण आहे? राहुल गांधींचा हिंदु धर्मावर लेख; सांगितला हिंदुत्वाची अर्थ, पाहा काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 03:36 PM2023-10-01T15:36:56+5:302023-10-01T15:38:13+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत दीड पानाचा लेख लिहिला आहे.

Who is a Hindu? Rahul Gandhi's article on Hinduism; Said meaning of Hindutva | हिंदू कोण आहे? राहुल गांधींचा हिंदु धर्मावर लेख; सांगितला हिंदुत्वाची अर्थ, पाहा काय म्हणाले...

हिंदू कोण आहे? राहुल गांधींचा हिंदु धर्मावर लेख; सांगितला हिंदुत्वाची अर्थ, पाहा काय म्हणाले...

googlenewsNext

Rahul Gandhi News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत दीड पानी लेख लिहिला आहे. राहुल यांनी सोशल मीडियावर 'सत्यम शिवम सुंदरम' या शीर्षकासह लेखाचा फोटो पोस्ट केला आहे. यात त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा आणि त्यात अंतर्भूत असलेली करुणा, प्रेम, त्याग आणि दया यावर प्रकाश टाकला आहे.  तसेच, त्यांनी या लेखात हिंदुत्वाचा अर्थ सांगितला आहे. 

'दुर्बलांचे रक्षण करणे, हे धर्म कर्तव्य आहे'

राहुल गांधींनी लेखात म्हटले की, 'सत्यम् शिवम् सुंदरम्...दुर्बलांचे रक्षण करणे, हे धर्माचे प्रमुख कर्तव्य आहे. एक हिंदू आपल्या अस्तित्वाच्या सर्व पैलूंना करुणा आणि सन्मानाने उदारपणे आत्मसात करतो. कारण त्याला माहित आहे की आपण सर्व, या जीवनाच्या महासागरात बुडत आहोत. हिंदू धर्म केवळ काही सांस्कृतिक श्रद्धांपुरता मर्यादित आहे, असे म्हणणे कमीपणाचे ठरेल. हिंदूला विशिष्ट राष्ट्र किंवा प्रदेशाशी बांधणे. हाही त्याचा अपमान आहे.'

'हिंदू धर्म हा सत्याचा स्वीकार करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग प्रत्येकासाठी आहे. एका हिंदूमध्ये त्याच्या भीतीकडे खोलवर जाऊन ते स्वीकारण्याचे धैर्य असते. आयुष्याच्या प्रवासात तो भीतीच्या शत्रूचे मित्रात रुपांतर करायला शिकतो. भीती त्याच्यावर कधीच मात करत नाही, उलट तो एक जवळचा मित्र बनते आणि त्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवते.' 

'ही कुणाची मालमत्ता नाही'
राहुल पुढे लिहितात, 'हिंदू जाणतो की जगातील सर्व ज्ञान सामूहिक आहे आणि ते सर्व लोकांच्या इच्छाशक्ती आणि प्रयत्नातून निर्माण झाले आहे. ही केवळ त्या व्यक्तीची मालमत्ता नाही. सर्व काही प्रत्येकाचे आहे त्याला माहित आहे की, कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि जगाच्या महासागराच्या या प्रवाहांमध्ये जीवन सतत बदलत असते. ज्ञानाच्या उत्कट उत्सुकतेच्या भावनेने प्रेरित हिंदूचा विवेक सदैव खुला असतो. तो नम्र आहे आणि या जगात भटकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून ऐकण्यास आणि शिकण्यास तयार आहे.'

'एका हिंदूचा आत्मा इतका कमकुवत नाही की, तो आपल्या भीतीच्या नियंत्रणात येऊन कोणत्याही प्रकारच्या राग, द्वेष आणि सुडाचे माध्यम बनले. एक हिंदू सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करतो. त्याला माहित आहे की या महासागरात पोहण्यासाठी प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग आहे. प्रत्येकाला स्वतःच्या मार्गावर चालण्याचा अधिकार आहे. तो सर्व मार्गांवर प्रेम करतो, प्रत्येकाचा आदर करतो आणि त्यांची उपस्थिती स्वतःची म्हणून स्वीकारतो,' अशा भावना राहुल गांधी यांनी आपल्या लेखातून व्यक्त केल्या आहेत.

लेख अशावेळी...
राहुल गांधी यांनी हिंदू धर्माविषयी हा लेख अशा वेळी लिहिला आहे, जेव्हा भाजप सातत्याने काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सनातन धर्माची बदनामी केल्याचा आरोप करत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माविरोधात भाष्य केले होते. स्टॅलिनचा पक्ष DMK हा इंडिया आघाडीचा भाग आहे. यावरुन सत्ताधारी विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. 

Web Title: Who is a Hindu? Rahul Gandhi's article on Hinduism; Said meaning of Hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.