भाजपाने 'भारता'चं नाव बदललं तर आम्ही कुठे जाऊन राहणार ? ममता बॅनर्जी संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 02:46 PM2017-10-17T14:46:25+5:302017-10-17T15:22:49+5:30

ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

Where would we go if the BJP changed India's name? Mamta Banerjee | भाजपाने 'भारता'चं नाव बदललं तर आम्ही कुठे जाऊन राहणार ? ममता बॅनर्जी संतापल्या

भाजपाने 'भारता'चं नाव बदललं तर आम्ही कुठे जाऊन राहणार ? ममता बॅनर्जी संतापल्या

Next

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कांग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीदेखील ताजमहालवरुन सुरु असलेल्या वादात उडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'भारतीय संस्कृती आणि वारसा संपवण्यासाठी भाजपाने आखलेला हा राजकीय अजेंडा आहे'. ममता बॅनर्जी यांनी भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालसंबंधी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. 'मुगलसराय स्थानकाचं नाव बदलून पंडित दिन दयाल उपाध्याय स्थानक करणा-या भाजपाने ताजमहालला का सोडलं ? त्याचं नाव का बदललं नाही ?' असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. यासोबतच जर भाजपाने देशाचं नाव बदललं तर आम्ही राहायचं कुठे ? असा उपहासात्मक सवालही त्यांनी विचारला. 

ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. काही युझर्सनी ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशला जाण्याचा सल्ला देऊन टाकला आहे. तर काहीजणांनी 'मग तुम्ही पश्चिम बंगालचं नाव का बदलत आहात ?' असा प्रश्न विचारला आहे. 


भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नव्या वादाला तोंड फोडले. ते म्हणाले की, ज्या सम्राटाने आपल्या वडिलांना तुरुंगात बंद केले होते आणि हिंदुंना लक्ष्य केले होते त्या सम्राटाने हा ताजमहाल उभारला आहे. त्यामुळे मुगल सम्राटांची नावे मिटविण्यासाठी इतिहास नव्याने लिहिण्यात येईल.

इतिहास मात्र, नेमका याच्या उलट आहे. शाहजहां यांनी आपली पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ ताजमहाल उभारला होता. शाहजहां यांचे पुत्र औरंगजेबाने त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात शाहजहां यांना तुरुंगात बंद केले होते. पण आमदार सोम म्हणाले की, मुगल सम्राट बाबर, अकबर आणि औरंगजेब यांची नावे इतिहासातून हटविण्याचे काम सरकार करीत आहे. उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन पुस्तकात ताजमहालचा समावेश केलेला नाही.

या पार्श्वभूमीवर सिसोली गावात ते म्हणाले की, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांबाबत शाळा, महाविद्यालयातून शिक्षण द्यायला हवे. 

ताजमहाल यापुढे पाहायचा नाही का?
भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहालच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी सवाल केला आहे की, ताजमहाल पाहण्यासाठी जाऊ नका, असे आवाहन सरकार पर्यटकांना करणार आहे काय?, असा सवाल केला आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार विश्वासघातकी असलेल्या लोकांनी लाल किल्लाही बनविला आहे. या ठिकाणी झेंडावंदन करणे मोदी बंद करणार आहेत का? असा प्रश्नही ओवैसी यांनी विचारला.

संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्लाही गुलामीची निशाणी, मिटवून टाका - आझम खान
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, फक्त ताजमहालच का....संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्लादेखील गुलामीची निशाणी आहेत, त्या मिटवून टाका असं म्हटलं आहे. 'गुलामीच्या सर्व निशाण्या मिटवल्या पाहिजेत हे मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे. फक्त ताजमहालच कशासाठी ? संसद, राष्ट्रपती भवन, कुतूब मिनार, लाल किल्ला का नाही ? या सगळ्याही गुलामीच्या निशाणी आहेत. जर या देशद्रोहींना बांधल्या आहेत तर मग त्यांना मिटवून टाकलं पाहिजे', असं आझम खान बोलले आहेत. 
 

Web Title: Where would we go if the BJP changed India's name? Mamta Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.