विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 05:55 AM2019-02-11T05:55:00+5:302019-02-11T05:55:01+5:30

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे.

 When the opposition parties are coming together, the BJP is in the forefront of disorder | विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

विरोधी पक्ष एकत्र येत असताना भाजपाप्रणीत आघाडीत अस्वस्थता

Next

- सुरेश भटेवरा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत सर्वच पक्षांचे खासदार आपापल्या नफा नुकसानीचा अंदाज घेत आहेत. काहींनी लढाईचे रणशिंग फुंकले आहे, तर काही पक्षांना जागावाटपाचा तिढा सुटण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधी मोदींवर आक्रमक हल्ले चढवीत राहुल गांधी प्रकाशात आले आणि गेल्या काही दिवसांत ममता बॅनर्जी, मायावती व अखिलेश यादवांनीही साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
उत्तरप्रदेशात सप बसपची आघाडी भाजपला भुईसपाट करायला सरसावली आहे तर पाटण्यात काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीनंतर बिहारमधे लालूप्रसाद व काँग्रेस आघाडीला यंदा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. बंगालमधे सीबीआयच्या अतिउत्साही कारवाईला ‘बंगाल विरुद्ध दिल्ली’ असे स्वरूप देण्यात ममता यशस्वी झाल्या. बहुतांश विरोधी पक्ष त्यांच्या पाठिशी उभे राहिले. अशा नाट्यपूर्ण घटनामुळे यंदाची निवडणूक केवळ पंतप्रधान मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून त्रिशंकू लोकसभेची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या निवासस्थानी येणाºया विरोधी नेत्यांच्या चर्चेतून हाच सूर ऐकू येत आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत. मात्र आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एकूणच मोदी-शहा यांच्या जोडीला रालोआच्या घटक पक्षांना सांभाळता आले नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीची संभावना ‘महाभेसळ’ अशी केली. मात्र एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र ठेवण्यात तेही अपयशी ठरले आहेत. निवडणुकीला थोडे दिवस उरल्याने जुन्या मित्रपक्षांना जवळ आणण्यात भाजपाची दमछाक सुरू आहे.

स्थिती चांगली नसल्याचा खासगीत खुलासा
- भाजपाला २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा मिळाल्या तर सहयोगी पक्षांना ५४ जागा मिळाल्यामुळे एनडीएचे संख्याबळ ३३५ पर्यंत पोहोचले. यंदा एनडीएची स्थिती मजबूत
नाही हे सत्ताधारी आघाडीचे खासदारही खासगीत सांगत आहेत.
- एनडीएतून तेलगू देशम व कुशवाहांचा रालोसपा बाहेर पडले. शिवसेना, अकाली दल, अपना दल यांचेही भाजपाशी संबंध २0१४ इतके सौहार्दाचे राहिलेले नाहीत. गुरूद्वारा प्रकरणात हस्तक्षेपाबाबत अकाली दलाने अल्टिमेटम देत भाजपावर डोळे वटारले आहेत.
- महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही ‘आम्हाला कोणाकडूनही जागांची भीक नको, पूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो
होतो, यापुढेही लढायची तयारी आहे’, असे इशारे देत आहेत.

Web Title:  When the opposition parties are coming together, the BJP is in the forefront of disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.