पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार

By Admin | Updated: July 5, 2017 11:40 IST2017-07-05T11:36:00+5:302017-07-05T11:40:12+5:30

एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता

West Bengal is blurred ... Ethnic violence due to a Facebook post | पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार

पश्चिम बंगाल धगधगतोय....एका फेसबूक पोस्टमुळे जातीय हिंसाचार

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 5 - एका फेसबूक पोस्टमुळे पश्चिम बंगालमध्ये जातीय हिंसाचार सुरु झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असून केंद्राने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सुरक्षेसाठी पाठवलं आहे. नॉर्थ 24 परगणा येथील ही घटना आहे. शुक्रवारी ही फेसबूक पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी लोकांनी एकमेकांवर हल्लेही केले असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
आणखी वाचा - 
500 रूपयांचा जिओ 4G मोबाइल बाजारात येण्याची शक्यता
त्यांच्या प्रेमाची गोष्ट ! बंगळुरुत "तिने" केलं "तिच्याशी" लग्न
इथेच तुला ठार करेन, GSTला विरोध करणा-या आमदाराला धमकी
 
 
एका 17 वर्षीय विद्यार्थ्यांने शुक्रवारी फेसबूवर धार्मिक स्थळासंबंधी पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला होता. हा विद्यार्थी बदुरिया येथील राहणार आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 
 
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून संतप्त जमावाने अनेक ठिकाणी रस्ते जाम केले होते. तसंच इतर जाती, धर्मातील लोकांवरही हल्ले होत असून, दुकानांची जाळपोळ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी जमावाने कोलकाताजवळील अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्गावर चक्का जाम आंदोलन केलं. कोलकातापासून 70 किमी अंतरावर सुरु झालेलं आंदोलन इतर ठिकाणी पसरत असून आता नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात पोहोचलं आहे. 
 
दरम्यान पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना अफवा न पसरवण्याचं तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. "कृपया अफवा पसरवू नका. सोशल मीडियावरील खोटे मेसेज पसरवणे धोकादायक ठरु शकतं. आपलं शहर शांततामय असून ते राखण्यास मदत करा. संशयित गोष्ट आढळल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधा" असं पोलिसांनी ट्विट केलं आहे. दरम्यान जातीय हिंसाचारानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदुरिया येथील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली. फोनवरुन बातचीत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल एखाद्या भाजपा नेत्याप्रमाणे माझ्याशी बोलत असल्याचा आरोप केला आहे. "मला खूपच अपमानास्पद वाटलं. पदाचा त्याग करण्याचा विचारही माझ्या मनात आला होता", असं ममता बॅनर्जी बोलल्या आहेत. 
यावर प्रतिक्रिया देताना राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी आपण ममता बॅनर्जीशीं बोलताना त्यांचा अपमान होईल असं काहीच बोललो नसल्याचा दावा केला आहे. 
 
दुसरीकडे भाजपाने बदुरिया हिंसाचारात केंद्राने दखल घेण्याची मागणी केली आहे. नॉर्थ 24 परगणा जिल्ह्यात दोन हजाराहून जास्त मुस्लिमांनी हिंदू कुटुंबावर हल्ला केला असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आपल्या कार्यालयांनाही जाणुनबुजून आग लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
 

Web Title: West Bengal is blurred ... Ethnic violence due to a Facebook post