वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट विकत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 09:23 AM2018-05-09T09:23:21+5:302018-05-09T09:23:21+5:30

15 बिलियन अमेरिकन डॉलर्सला फ्लिपकार्टची विक्री

walmart to buy 70 percent stake in flipkart | वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट विकत घेणार

वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट विकत घेणार

Next

नवी दिल्ली: रिटेल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली वॉलमार्ट आज फ्लिपकार्ट कंपनी विकत घेणार आहे. 15 बिलियन अमेरिकन डॉलर्समध्ये वॉलमार्टनं फ्लिपकार्ट विकत घेतलीय. आज दुपारपर्यंत याबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन भारतात आले आहेत. 

वॉलमार्ट ही जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. या दोन कंपन्यांमध्ये तब्बल 15 बिलियन अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार होणार आहे. यामुळे वॉलमार्ट ही कंपनी भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करेल. वॉलमार्टकडून फ्लिपकार्टची खरेदीहोत असल्याची घोषणा होण्याआधी बंगळुरुमधील टेक व्हिलेजमध्ये वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डाऊज मॅकमिलन फ्लिपकार्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील. यानंतर दोन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांची गुरुग्राममधील वॉलमार्ट इंडियाच्या मुख्यालयात बैठक होईल.

फ्लिपकार्टच्या खरेदीसाठी वॉलमार्टनं 15 बिलियन अमेरिकन डॉलर मोजले आहेत. फ्लिपकार्टच्या खरेदीत अॅमेझॉननंदेखील रस दाखवला होता. मात्र फ्लिपकार्टनं वॉलमार्टनं दिलेला प्रस्ताव स्वीकारला. फ्लिपकार्टमधील 75 ते 80 टक्के हिस्सा वॉलमार्ट खरेदी करणार आहे. यातून होणाऱ्या फायद्यावर फ्लिपकार्टला कर भरावा लागेल. 

अॅमेझॉनमध्ये काम करताना सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांना फ्लिपकार्टची कल्पना सुचली. यातूनच पुढे फ्लिपकार्टचा जन्म आणि विस्तार झाला. यानंतर पुढे अॅमेझॉननंदेखील भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवलं. फ्लिपकार्टनं अॅमेझॉनला चांगली टक्कर दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फ्लिपकार्टचं महसुली उत्पन्न घटलं होतं. 
 

Web Title: walmart to buy 70 percent stake in flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.